जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिंदे सरकारची संभाव्य यादी आली समोर, नितेश राणे-दरेकरांना मंत्रिपदाची लॉटरी?

शिंदे सरकारची संभाव्य यादी आली समोर, नितेश राणे-दरेकरांना मंत्रिपदाची लॉटरी?

कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होणार आहे. पण त्याआधी मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी समोर आली

कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होणार आहे. पण त्याआधी मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी समोर आली

कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होणार आहे. पण त्याआधी मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी समोर आली

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 04 ऑगस्ट : शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. पण, महिना उलटला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही. पण, आता 5 ऑगस्टला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारमध्ये कुणा-कुणाची वर्णी लागणार याची संभाव्य यादी समोर आली आहे. शिवसेना कुणाची या वादावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे शिंदे गटामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची हालचाल सुरू आहे. कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होणार आहे. पण त्याआधी मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी समोर आली आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, नितेश राणे, बबनराव लोणीकर यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. तर शिंदे गटातून शंभूराजे देसाई, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर यांची नावं समोर आली आहे. जे शिवसेनेमध्ये मंत्री होते त्यांनाच मंत्रिपद दिले जात आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारातील नव्या चेहऱ्यांना पाहून काहींना आश्चर्याचा धक्का बसू शकतो. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद भूषवणाऱ्या शिवसेना नेत्यांना पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेता येणार नाही. त्यांना wait and watch या भूमिकेवर ठेवलं जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाचा दोन टप्प्यात विस्तार होणार आहे. त्यापैकी पहिला विस्तार हा 5 ऑगस्टला होणार आहे. पहिल्या टप्प्यात 15 ते 16 मंत्री शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या शपथविधीच्या कार्यक्रमाला थेट केंद्रातील भाजप नेते येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा  60-40 असा फॉर्म्युला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला 15 ते 16 मंत्र्यांचा शपविधी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजप गृह खातं स्वत:कडे ठेवणार आहे. 60-40 असा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला आहे. या विस्तारात शिवसेनेतील शिंदे गटाच्या अनेक माजी मंत्र्यांना वेट अॅड वॉचवर ठेवणार. मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. या शपथविधीला केंद्रातून भाजप नेते येण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात