मुंबई, 19 मार्च : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) सत्तेत आल्यापासून भाजप **(BJP)**कडून तिन्ही पक्षांच्या नेत्यांवर आरोप करण्यात येत आहेत. त्यातच भाजपकडून सरकार कोसळण्याच्या तारखाही वारंवार दिल्या जात आहेत. याच दरम्यान भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी मविआचे 25 आमदार (MVA MLA) आपल्या संपर्कात असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली. त्यानंतर आजा शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी रावसाहेब दानवेंच्या या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांची गुगली रावसाहेब दानवे यांनी केलेल्या या दाव्यावर संजय राऊत म्हणाले, काल धुळवड होती. लोक धुळवडीला नशा करतात, भांग पितात… अशी काही परंपरा आहे. माझ्याकडे अशी काही माहिती नाहीये की, रावसाहेब दानवे भांग पितात. रावसाहेब दानवे भांग वगैरे पित नाहीत माझे चांगले मित्र आहेत. दिल्लीत माझ्या शेजारीच राहतात. त्यांना भांगेची नशा किंवा इतर कुठली नशा करण्याची त्यांना आवश्यकता पडली. तरी ते कोणत्या नशेत असं बोलले मला माहिती नाही. वाचा : MIM सोबत हातमिळवणी?इम्तियाज जलील यांच्या ऑफरवर शिवसेनेकडून आली पहिली प्रतिक्रिया संजय राऊत पुढे म्हणाले, ते 25 बोलले कदाचित त्यांना 125 बोलायचं असेल. की 125 आमदार महाविकास आघाडीचे आमच्या संपर्कात आहेत. स्लिप ऑफ टंग झालं असेल. उद्या मी म्हटलं की, तुमचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत.. आणि आहेतच. तर तुम्ही काय म्हणाल. पण आता होळी संपलेली आहे. रात्री नशा उतरली असेल काल काय बोललो ते आज बहुतेक आठवणार नाही. नेमकं काय म्हणाले होते रावसाहेब दानवे? भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील 25 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा मोठा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. “महाविकास आघाडीतील 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते. पण थोडीफार मदत करुन सावरले. निवडणुका येऊ द्या, एक-एक भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील”, असं धक्कादायक विधान रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. दरम्यान, दानवे यांना पत्रकारांनी 25 आमदारांपैकी काही आमदारांची नावे विचारली. पण दानवेंनी त्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. “जे आमदार संपर्कात आहेत, त्यांची नावे सांगून मला त्यांची आमदारकी धोक्यात आणायची नाही. पण निवडणुकीच्या तोंडावर ते प्रवेश करणार आहेत”, असं म्हणत दानवेंनी त्या आमदरांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्तही सांगितला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.