मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Raj Thackeray : राज ठाकरेंची गर्जना, ‘प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही’

Raj Thackeray : राज ठाकरेंची गर्जना, ‘प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही’

पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही. विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले

पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही. विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले

नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. (Raj Thackeray)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 सप्टेंबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवत आवाज उठवला आहे. त्यांनी राज्यातील लहान मुलांना वेठबिगारी करावी लागत असल्याच्या घटनांकडे लक्ष वळवत प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. अशा आशयाच्या बातम्या वाचताना मन विषण्ण करत असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालल्याचेही सांगितले.

राज ठाकरे काय म्हणाले…

गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचं उच्चाटन झालं असलं तरी ही प्रथा अस्तित्वात आहे, आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही.

हे ही वाचा : 'बाप कधीही चोरता येत नसतो, बाळासाहेब हे कोणाचे..'; शिंदे गटातील आमदाराने उद्धव ठाकरेंना सुनावलं

राज्यसरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ह्या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं.

पण हे करताना एकूणच जागृत समाजाने पण पुढे यायला हवं. वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे, आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी. असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांची तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच.

हे ही वाचा :  शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मोदी, शाहांची उपस्थिती? का लांबला मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा?

पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील. ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत हीच इच्छा.

First published:

Tags: Maharashtra News, MNS, Raj raj thackeray, Raj Thackeray Latest News