मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

50 हजार व्याजाने घेतले अन् लाखमोलाचा जीव गमावला, तरुणासोबत घडलं भयंकर!

50 हजार व्याजाने घेतले अन् लाखमोलाचा जीव गमावला, तरुणासोबत घडलं भयंकर!

पेण तालुक्यातील दिव येथे राहणाऱ्या तरुणाला मारहाण करून पैशाची वसुली करण्यात येत होती. याचकारणावरून त्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे.

पेण तालुक्यातील दिव येथे राहणाऱ्या तरुणाला मारहाण करून पैशाची वसुली करण्यात येत होती. याचकारणावरून त्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे.

पेण तालुक्यातील दिव येथे राहणाऱ्या तरुणाला मारहाण करून पैशाची वसुली करण्यात येत होती. याचकारणावरून त्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Raigad, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

प्रमोद पाटील (रायगड), 20 नोव्हेंबर : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रायगड जिल्ह्यात अद्यापही सावकारीचे प्रकार सुरू आहेत या प्रकारातून एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. पेण तालुक्यातील दिव येथे राहणाऱ्या तरुणाला मारहाण करून पैशाची वसुली करण्यात येत होती. याचकारणावरून त्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. यामुळे पेण तालुक्यात या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पेण तालुक्यातील दिव येथे राहणाऱ्या एका तरुणाने घेतलेले व्याजी पैसे वेळेत परत न दिल्याने  आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान त्या तरुणाला तिघांनी घरासमोर मारहाण केल्याने झालेल्या त्रासाला कंटाळून तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली.

हे ही वाचा : लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार, विद्यार्थिनीचा प्राध्यापकावर आरोप; घटनेने खळबळ

पेण मधील दिव गावात ही घटना घडली असून या घटनेमुळे पेण तालुक्यात खळबळ माजली आहे. या घटनेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमानुसार वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहा महिन्यांपूर्वी दिव येथे राहणाऱ्या विजय म्हात्रे, या तरुणाने खाजगी कामासाठी आरोपी मयुर धांडे, साजन पाटील, भुषण म्हात्रे यांच्या कडून 10 टक्के व्याजाने 50 हजार रूपये घेतले होते, 3महिन्यापासून व्याज दिले नसल्याने तसेच घेतलेले 50 हजार रूपये ही देण्यात आले नसल्याने तिघा आरोपींनी त्याला घरासमोर मारहाण करत शिवीगाळी तसेच दमदाटी केली. या झालेल्या त्रासामुळे विजय म्हात्रे आपल्या राहत्या घरी स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली.

हे ही वाचा : आफताबच्या आईवडिलांनाही कल्पना होती, पण.. श्रद्धाच्या मॅनेजरची धक्कादायक माहिती

याबात वडखळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार गून्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असुन दोन आरोपींचा पोलीस तपास करत आहेत.घटनेतील तरुणाने आत्महत्या करण्याच्या उचललेल्या पावलामुळे नागरिकांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर सावकारी प्रकरणाने खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Crime news, Raigad, Raigad news, Raigad police, Suicide news