मुंबई, 31 जानेवारी: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या काळात ऑनलाइन (online college) अभ्यासाठी सवय लागल्यामुळे विद्यार्थी आता ऑफलाइन परीक्षा (offline exam) देण्यासाठी तयार होत नसल्याचे भीषण चित्र समोर आले आहे. राज्य सरकारने कोरोनाची लाट ओसरल्यामुळे कॉलेजमध्ये परीक्षा घेण्याची सूचना केली पण विद्यार्थ्यांनी याला कडाडून विरोध केला आहे. आज शेकडो विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराबाहेर घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. कोरोनाची लाट ओसारल्यामुळे शाळा आणि महाविद्यालय आता सुरू होणार आहे. एकीकडे पालकांनी शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे ऑफलाइन परीक्षा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थी चांगलेच संतापले आहे. आज संतापलेल्या या विद्यार्थ्यांनी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेरच जमत जोरदार घोषणाबाजी केली.
शालेय शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज pic.twitter.com/YroCWBwa1i
— News18Lokmat (@News18lokmat) January 31, 2022
वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी परीक्षा या ऑफलाईन स्वरूपात घेतल्या जातील असा निर्णय घेतलेला होता. या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. वर्षभर ऑनलाइन शिकवण्यात आले, आणि आता ऑफलाइन परीक्षा का घेण्यात येत आहे? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला असून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतल्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले आहे.
पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज करून पिटाळले pic.twitter.com/CcvSHXdRyJ
— News18Lokmat (@News18lokmat) January 31, 2022
शेकडो विद्यार्थ्यांनी वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर जमले असून जोरदार घोषणाबाजी करत आहे. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार सुद्धा करावा लागला होता. बीडमध्ये विद्यार्थ्यांनी काढली रॅली तर दुसरीकडे, दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घेण्यात याव्यात, अशी ही मागणी घेऊन बीडमध्ये विद्यार्थ्यांनी रॅली काढत जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे. राज्यात सुरू असलेल्या एसटी संपामुळे, गावखेड्यातील बस अद्यापही बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात शिक्षणासाठी येता येत नाही. जर खाजगी वाहनांनी यायचं म्हटलं तर वाहन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेतल्या तर आमचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं. यामुळे बोर्डाने ठरवलेले ऑफलाइन पेपर हे ऑनलाइन घेण्यात यावेत. ही मागणी घेऊन बीडमध्ये विद्यार्थ्यांनी रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.