प्रमोद पाटील, पनवेल, 08 ऑक्टोंबर : पनवेलमध्ये रेल्वेवरून गोंधळ उडाला आहे. ज्या प्लॅटफॉर्मला गाडी लागणार होती तिथे न लागता पलिकडच्या प्लॅटफॉर्मला लागल्याने प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. यामध्ये पनवेल स्थानकावर दिवा -रोहा गाडी प्लॅटफॉर्मला न लागल्याने प्रवाश्यांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या टाकत पकडल्याने नागरिकांनाी जिवाशी खेळत ही ट्रेन पकडली. दिवा रोहा ही ट्रेन सकाळी 9.30 ला प्लॅटफॉर्म क्रमांक 5 ला लागणार होती परंतु ती चुकून मालगाडीच्या ट्रॅकवर लागल्याने गोंधळ उडाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलमध्ये रेल्वेवरून गोंधळ उडाला आहे. ज्या प्लॅटफॉर्मला गाडी लागणार होती तिथे न लागता पलिकडच्या प्लॅटफॉर्मला लागल्याने प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. यामध्ये पनवेल स्थानकावर दिवा -रोहा गाडी प्लॅटफॉर्मला न लागल्याने प्रवाश्यांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या टाकत पकडल्याने नागरिकांनाी जिवाशी खेळत ही ट्रेन पकडली. दिवा रोहा ही ट्रेन सकाळी 9.30 ला प्लॅटफॉर्म क्रमांक 5 ला लागणार होती परंतु ती चुकून मालगाडीच्या ट्रॅकवर लागल्याने गोंधळ उडाला.
हे ही वाचा :
दिवा-रोहा गाडी प्लॅटफॉर्मला न लागल्याने प्रवाश्यांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या टाकत पकडली ट्रेन, रोहा गाडी चुकून मालगाडीच्या ट्रॅकवर गेली. pic.twitter.com/69V655KBsr
— News18Lokmat (@News18lokmat) October 8, 2022
ahref=“https://lokmat.news18.com/maharashtra/pune/man-theft-at-his-girlfriends-house-to-revenge-a-breakup-mhkp-770884.html">पुणे: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी YouTube वर व्हिडिओ पाहिला, मग प्रेयसीच्या घरात घुसला अन्.., तरुणाचं धक्कादायक कृत्य
दरम्यान ज्या ट्रॅकवर ही रेल्वे लागली होती त्याला लागून एक माल वाहतूक रेल्वे लागली होती. त्यामुळे प्रवाश्यांनी उड्या टाकून रेल्वे ट्रॅक क्रॉस केला तसेच उभ्या असलेल्या रिकाम्या मालगाडी रेल्वेमधून ट्रेनमध्ये प्रवासी चढले. पनवेल रेल्वे स्थानकावरील या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. या प्रकारा बाबत मध्य रेल्वे कडून चौकशी सुरू झाली आहे.
मुंबई लोकलमध्ये बसण्यावरून महिलांची हाणामारी
ठाणे ते पनवेल या दरम्यान प्रवास करताना लोकल ट्रेनमध्ये महिलांमध्ये बसण्याच्या जागेवरुन वाद झाला. हा वाद इतका वाढला की, सुरुवातीला बाचाबाची झाली आणि त्यानंतर चक्क हाणामारी सुरू झाली. लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून तीन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ठाण्यावरून बसलेल्या मायलेकी आणि नात या पनवेलचे दिशेने जात असताना कोपरखैरणे येथे एक महिला चढली. तुर्भे रेल्वे स्थानकात गाडी आल्यावर जागा झाली यामुळे ती बसली असता छोट्या मुलीला बसू दिलं नाही यावरून शाब्दिक वाद झाला. त्यानंतर या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं.
हे ही वाचा : nashik bus accident : नाशिक बस अपघाताची धक्कादायक माहिती समोर
या लोकलमध्ये नेरूळ वरून महिला पोलीस कर्मचारी भांडण सोडवण्यासाठी चढल्या असतात त्यांना देखील या मारहाणीत दुखापत झाली आहे. लोकल ट्रेनमधील महिलांमध्ये सुरू असलेल्या हाणामारीची ही घटना त्याच डब्यातील काही महिलांनी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केली. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.