जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Palghar : दुर्दैवी! पोहायला गेलेल्या दोन तरूणांचा बुडून मृत्यू, पालघरमधील घटनेने हळहळ

Palghar : दुर्दैवी! पोहायला गेलेल्या दोन तरूणांचा बुडून मृत्यू, पालघरमधील घटनेने हळहळ

Palghar : दुर्दैवी! पोहायला गेलेल्या दोन तरूणांचा बुडून मृत्यू, पालघरमधील घटनेने हळहळ

पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील आवंढे येथील वैतरणा नदीत पोहण्यासाठी आलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

राहुल पाटील (पालघर), 05 नोव्हेंबर : पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील आवंढे येथील वैतरणा नदीत पोहण्यासाठी आलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल (दि.05) संध्याकाळी पाचच्या सुमारास ठाणे येथील रहिवासी असलेल्या दोन मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला. सुनील बाबू डिके (वय 30) आणि कार्तिक जाणू कोदे (वय 17) अशी दोघांची नावे आहेत. वाडा तालुक्यातील आवंडे येथे वैतरणा नदीत पोहण्यासाठी आले होते यावेळी ते बुडाले.

जाहिरात

मात्र नदीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हे दोन्ही तरुण बुडाले. आरडाओरड केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत सुनील या तीस वर्षीय तरुणाला पाण्याबाहेर काढलं. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना सुनीलचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंधार झाल्याने शोध कार्यात अडचणी येत असल्याने पहाटेच्या सुमारास स्थानिकांच्या मदतीने कार्तिकचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आल आहे.

हे ही वाचा :  10 वर्षाच्या मुलाने केली आई आणि तिच्या प्रियकराची पोलखोल, पोलिसांना दिली पित्याच्या हत्येची माहिती

वाडा तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत असताना देखील फायर ब्रिगेड आणि नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्यासाठी आवश्यक असलेली साधनसामग्री तसंच रेस्क्यू टीम उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे वाड्यात अग्निशमन दलयंत्रणा आणि नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्यासाठी आवश्यक असणारी रेस्क्यू टीम कधी स्थापन केली जाणार ? असा अहवाल येथील स्थानिक नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतोय.

जाहिरात

आज पहाटेच्या सुमारास स्थानिकांच्या मदतीने बुडालेला दुसरा तरुण कार्तिकचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. वाडा तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत असताना देखील फायरब्रिगेड आणि नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्यासाठी आवश्यक असलेली साधनसामग्री आणि बचावपथक उपलब्ध नसल्याने स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हे ही वाचा :  मालेगावात भीषण अग्नितांडव; अनेक यंत्रमाग कारखाने आगीच्या भक्ष्यस्थानी, घटनास्थळावरील VIDEO

जाहिरात

त्यामुळे वाड्यात अग्निशमन दल यंत्रणा आणि नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्यासाठी आवश्यक असणारी जीवरक्षक टीम कधी स्थापन केली जाणार असा सवाल येथील स्थानिक नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात