मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Nawab Malik यांचा दावा खरा ठरला? Aryan Khan याला ड्रग्ज प्रकरणात अडकवलं?

Nawab Malik यांचा दावा खरा ठरला? Aryan Khan याला ड्रग्ज प्रकरणात अडकवलं?

Aryan Khan drug case: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज नव्हते असे तपासात समोर आल्याचं वृत्त आहे.

Aryan Khan drug case: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज नव्हते असे तपासात समोर आल्याचं वृत्त आहे.

Aryan Khan drug case: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज नव्हते असे तपासात समोर आल्याचं वृत्त आहे.

मुंबई, 2 मार्च : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Cordelia Cruises drug party case) आता मोठी घडामोड समोर आली आहे. या क्रूझवर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक करण्यात आली होती. ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आल्याने संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आणि विविध चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबीवर गंभीर आरोप केले होते. त्याच दरम्यान आता एनसीबीने चौकशीसाठी स्थापन केलेल्या एसआयटीचा रिपोर्ट समोर आला असून त्यात आर्यन खानचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी केलेला दावा खरा असल्याचं आता बोललं जात आहे.

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान याला अडकवण्यात आलं असून हा संपूर्ण प्रकार किडनॅपिंग आणि वसुलीचा आहे असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला होता. तसेच या प्रकरणात मोहित भारतीय हा मास्टरमाईंड असल्याचा दावाही नवाब मलिकांनी केला होता. आता एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या अहवालानुसार अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानकडे कोणतेही अंमली पदार्थ नव्हते. तसेच आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग्ज रॅकेटशी संबंध नाही असंही तपासात समोर आलं आहे. एनसीबीने स्थापन केलेल्या एसआयटी म्हणजेच विशेष चौकशी समितीने चौकशीअंती हा निष्कर्ष काढला आहे. या संदर्भात हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिलं आहे.

एनसीबीनेच स्थापन केलेल्या एसआयटीने आर्यन खान याचा ड्रग्ज प्रकरणात कुठलाही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आर्यन खानला खरंच या क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अडकवलं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाचा : आर्यन खानकडे Durg होते की नाही? एनसीबीच्या विशेष चौकशीत झाला मोठा खुलासा

काय केला होता नवाब मलिकांनी दावा

आर्यन खानला अटक झाल्यानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे पत्रकार परिषद घेत एनसीबीवर वारंवार आरोप करत होते. काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आर्यन खानला अडकवण्याचा प्लॅन होता असंही म्हटलं होतं. आर्यन खान हा स्वत: तिकीट काढून क्रूझवर पार्टीसाठी गेला नव्हता तर त्याला प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला यांनी क्रूझवर नेलं होतं. हा संपूर्ण प्रकार किडनॅपिंग आणि खंडणी वसुलीचा आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड हा मोहित भारतीय आहे असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला होता.

वाचा : 'हा प्रकार किडनॅपिंग आणि वसुलीचा' नवाब मलिकांचा गंभीर आरोप

मोहित कंबोज यांच्या मेव्हण्याच्या माध्यमातून सापळा रचण्यात आला आणि आर्यन खानला क्रूझवर नेलं. त्यानंतर किडनॅप करुन 25 कोटींची मागणी करण्यात आली. डील 18 कोटींवर फायनल झाली. त्यापैकी 50 लाख रुपये घेण्यात आले. मात्र, एका सेल्फीने त्यांचा संपूर्ण खेळ बिघडवला. किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज आहे. वसुलीत मोहित कंबोज (भारतीय) हा वानखेडेंचा साथीदार आहे असंही नवाब मलिकांनी म्हटलं होतं.

First published:

Tags: Aryan khan, Drug case, Nawab malik, NCB