जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Navi Mumbai Crime : धक्कादायक! कोणतेही कारण नसताना अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून हत्या, नवी मुंबई हादरली

Navi Mumbai Crime : धक्कादायक! कोणतेही कारण नसताना अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून हत्या, नवी मुंबई हादरली

Navi Mumbai Crime : धक्कादायक! कोणतेही कारण नसताना अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून हत्या, नवी मुंबई हादरली

नवी मुंबईतील सेक्टर 15 च्या कोपर खैरणेमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 17 वर्षीय मुलाचा एका अज्ञात इसमाने दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

प्रमोद पाटील, 19 ऑक्टोबर : नवी मुंबईतील सेक्टर 15 च्या कोपर खैरणेमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 17 वर्षीय मुलाचा एका अज्ञात इसमाने दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या मुलाचा कोणत्या कारणावरून खून करण्यात आला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजून शकली नाही. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. अचानक घडलेल्या या घटनेने मुलाच्या घरच्यांनी हंबरडा फोडल्याने परिसर सुन्न झाला होता.

जाहिरात

साहिल शांताराम गोळे वय(17) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. सेक्टर 15 कोपरखैरणे या भागातच तो राहत होता. साहिलचा सेक्टर 23 कोपरखैरणेमधील भूमिपुत्र या मैदानावर खून करण्यात आला. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान या मुलाचा कोणत्या कारणावरून खून करण्यात आला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

हे ही वाचा :  मधुचंद्रापूर्वीच नवरीने केली नसबंदी, त्यानंतर आणखी एक कांड; नवरा Shocked!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आला आहे. तसेच परिसराची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगित. या अल्पवयीन मुलाचा कोणत्या कारणावरून खून झाला. याचे धागेदोरे काढण्यासाठी पोलिसांनी यंत्रणा सज्ज केली आहे. आसपासचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत, तर काही नागरिकांना विचारणा केली जात आहे.

ठाण्यातील तरुणासोबत थायलंडमध्ये घडला धक्कादायक प्रकार

जाहिरात

क्रिप्टो करन्सीच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या थायलंड येथील आंतरराष्ट्रीय टोळीने ठाण्यातील एका तरुणाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नोकरी देण्याचे बहाने आशिषला थायलंडमध्ये बोलावलं होतं आणि त्यानंतर ओलीस ठेवले आहे. आता हा तरुण आपली सुटका करून घेण्यासाठी दयावाया करत आहे.

हे ही वाचा :  लग्न, धमकी, राग अन् संसाराचा The End; 48 तासात चक्र फिरलं, अन् कविताचा गेला जीव

जाहिरात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यामधल्या वागळे इस्टेट येथे राहणारा उच्चशिक्षित तरुण आशिष दुबे याच्यासोबत हा प्रकार घडला आहे. 20 सप्टेंबरला आशिष दुबे थायलंड इथं कामानिमित्त गेला होता. त्याच्या एका ओळखीच्या मित्राने थायलंडमध्ये डिजिटल मार्केटिंग या फिल्डमध्ये काम असून चांगल्या पगाराची नोकरी आहे, असं सांगितलं होतं. त्यानुसार आशिषने सर्व प्रक्रिया पूर्ण करून थायलंडमध्ये त्या कंपनीत नोकरी मिळवली.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात