जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / "सुशांतसिंहच्या घरी काहीजण गेले, मंत्र्याची गाडी होती, बाचाबाची झाली आणि...." नारायण राणेंचा खळबळजनक दावा

"सुशांतसिंहच्या घरी काहीजण गेले, मंत्र्याची गाडी होती, बाचाबाची झाली आणि...." नारायण राणेंचा खळबळजनक दावा

"सुशांतसिंहच्या घरी काहीजण गेले, मंत्र्याची गाडी होती, बाचाबाची झाली आणि....", राणेंचा खळबळजनक दावा

"सुशांतसिंहच्या घरी काहीजण गेले, मंत्र्याची गाडी होती, बाचाबाची झाली आणि....", राणेंचा खळबळजनक दावा

Narayan Rane PC: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 फेब्रुवारी : शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही थेट हल्लाबोल केला. इतकेच नाही तर मातोश्रीवर ईडीची नोटीस, सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि दिशा सालियन (Disha Salian) यांच्या मृत्यूवरही भाष्य करत नारायण राणे यांनी खळबळजनक दावा सुद्धा केला आहे. त्या रजिस्टरमधील पाने कोणी फाडली? नारायण राणे म्हणाले, 8 जून रोजी दिशा सालियनची हत्या झाली. सांगितलं आत्महत्या केली. का करेल ती आत्महत्या? एकतर ती पार्टीला जात नव्हती. जबरदस्ती बोलवलं. त्यानंतर ती थांबत नव्हती, घरी जायला निघाली होती. त्यानंतर कोण-कोण होते? पोलीस संरक्षण कोणाला होतं? तिच्यावर वाईट कृत्य होत असताना बाहेर संरक्षण कोणाचं होतं. सालियनचा पोस्टमार्टम रिपोर्ट अजून आला नाही, का नाही आला? सात महिन्यात यायला हवा होता. दिशा सालियन ज्या इमारतीत राहत होती त्या इमारतीच्या रजिस्टरमधील 8 जूनची पाने कोणी फाडली? कोणाला इन्ट्रेस्ट होता. वाचा :  ‘सुशांतच्या हत्येनंतर मिलिंद नार्वेकरांच्या फोनवरुन मुख्यमंत्र्यांचा दोनवेळा कॉल’, नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट कोणत्या मंत्र्याची गाडी होती? त्यानंतर दिशा सालियनबाबत सुशांतसिंगला जेव्हा कळालं तेव्हा तो कुठे तरी बोलला की मी यांना सोडणार नाही. त्यानंतर काहीजण त्याच्या घरी गेले. दिशा सालियनच्या मुद्द्यावरुन बाचाबाची झाली. त्यात बिचाऱ्या सुशांतची हत्या करण्यात आली. तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी होती? त्या इमारतीचं त्या दिवशीचं सीसीटीव्ही गायब कसे झाले? आधी सीसीटीव्ही होते असं सोसायटीचे लोक सांगतात. ठराविक माणसाची रुग्णवाहिका कशी आली, रुग्णवाहिका कोणी आणली? रुग्णालयात कोणी नेलं, पुरावे कुणी नष्ट केले? या सर्वांची चौकशी होणार. त्यात कोणते अधिकारी होते ते सुद्धा आता तिकडे राहिले नाहीत. ते उघडं करतील आता सगळं, हा महाराष्ट्र? अशा रितीने? कलाक्षेत्रात चांगली संधी आहे म्हणून देशभरातून कलाकार मुंबईत येतात. अशा एका तरुण कलाकाराची हत्या केली. कोणी केली? जुन्या काही घटना आठवतात अशा काही हत्येत आरोपी सापडले नाहीत असंही नारायण राणे म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात