मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Mumbai Alert : मुंबई हल्ल्याची धमकी देणाऱ्या 'त्या' मेसेजचं सत्य समोर

Mumbai Alert : मुंबई हल्ल्याची धमकी देणाऱ्या 'त्या' मेसेजचं सत्य समोर

26/11 हल्ला (फाईल फोटो)

26/11 हल्ला (फाईल फोटो)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा मेसेज सोमालियातील नंबरवरून आल्याचं सांगितलं जात आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, २६ ऑगस्ट : हरिहरेश्वरला संशयित बोट सापडली. त्यानंतर मुंबईत निनावी हल्ला करण्याची धमकी देणारा फोन आला. हा फोन पाकिस्तानमधून आल्याचं समोर आलं होतं. आता पुन्हा एकदा मुंबईत हल्ल्याची धमकी देणाऱ्या त्या मेसेजचं सत्य समोर आलं आहे.

मुंबईत हल्ला घडवून आणण्याची धमकी देणारा मेसेज वाहतूक नियंत्रण कक्षाला आला होता. त्यामुळे पोलीस आणि वाहतूक नियंत्रण कक्ष अलर्ट मोडवर आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशात वेगवेगळ्या घटना घडत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा मेसेज सोमालियातील नंबरवरून आल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सोमालियात 26/11 सारखा हल्ला झाला आणि असा हल्ला पुन्हा मुंबईत होणार नाही याची काळजी घ्यावी, असा संदेश एका अज्ञात व्यक्तीनं मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रणाला पाठवला होता.

सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशात आधीच अलर्ट आहे. तर महत्त्वाच्या शहरांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हरिहरेश्वरला संशयास्पद बोट सापडली. त्यामुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

First published:

Tags: Mumbai, Mumbai ATS