मुंबई, 2 एप्रिल : 'मी धर्मांध नाही..प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. यापूर्वी मशिदींवरील भोंग्याबाबत मी बोललो होतो. पण अजूनही ते सुरू आहे. यापुढे सरकारने मशिदीतील हे भोंगे काढले नाही तर त्या मशिदींबाहेर दुप्पट आवाजाने स्पिकर लावू आणि त्यात हनुमानचालीसा वाजवू', असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. मदरशांवर धाडी टाका, बघा तुम्हाला काय काय सापडले, असंही ते यावेळी म्हणाले.
हजारो मनसैनिकांच्या उपस्थितीत गुढीपाडव्याच्या मेळाव्याला उत्साहात सुरुवात झाली. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर होणाऱ्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. यावेळी राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले.
आणखी काय म्हणाले राज ठाकरे...
- जातीपातीचं राजकारण शरद पवारांना हवं आहे. १९९९ साली जात होती, मात्र त्यात अभिमान होता. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर इतर जातीबद्दल द्वेष निर्माण करण्याचं काम केलं. मराठा आरक्षणासारखे मुद्दे आणायचे. जातीपातीवरुन भंडणं करता तुम्ही हिंदू कधी होणार?
- उ. प्रदेशात चांगला विकास होतोय, तर ती चांगली गोष्ट आहे. नरेंद्र मोदींचं कौतुक
- राज ठाकरे अयोध्येला जाणार, तारीख नाही सांगणार. मात्र जातीपातीतून काही होणार नाही. कुठलं हिंदुत्व घेऊन बसलोय आपण?
- एसटी कर्मचारी ओरडतायेत, पोलीस ओरडतोय, शेतकरी आत्महत्या करतोय, शिक्षणाचा बट्टाबोळ झालाय. एसएससीवाल्यांना नोकऱ्या मिळणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Raj thacarey, Raj thackarey