Home /News /mumbai /

मुंबईवर प्रेम आहे तर कांजूरची जागा का देत नाही? मेट्रोच्या श्रेयवादावरून मुख्यमंत्र्याचा भाजपवर निशाणा

मुंबईवर प्रेम आहे तर कांजूरची जागा का देत नाही? मेट्रोच्या श्रेयवादावरून मुख्यमंत्र्याचा भाजपवर निशाणा

रातोरात ज्यांनी झाडं कापली ते मुंबईकरांनी पाहिलं आहे. बुलेट ट्रेनचा काय उपयोग आहे का? मेट्रो कारशेडसाठी जागा देत नाही. मुंबईकरांवरं प्रेम आहे मग का कांजूरची जागा मेट्रो 3 ला द्या, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

पुढे वाचा ...
    मुंबई, 2 एप्रिल : गुढीपाडव्याचा (Gudi Padwa 2022) मुहूर्त साधत आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A चे लोकार्पण केलं आहे. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. मेट्रोच्या लोकापर्णाआधी श्रेयवादाची लढाई रंगली होती. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की,  मुंबईबद्दलचं प्रेम हे आपल्या कामातून दिसलं पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखून विकास केला जात आहे. रातोरात ज्यांनी झाडं कापली ते मुंबईकरांनी पाहिलं आहे. राजकारणात एक नवीन साथ आली आहे. या व्हायरसची लक्षणे दिसत नाही मात्र लागण झाल्यानंतर आरोप सुरू होतात. जे काही केलं ते सगळं आम्हीच केलं आणि इतरांनी काही केलं तर त्यात भ्रष्टाचार झाल्याचं दिसतं, असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला. 'शरद पवारांनी पंतप्रधान व्हावं', भाजपच्या जवळ असलेल्या नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ मुंबईवर प्रेम आहे तर कांजूरची ओसाड जमीन का देत नाही? बुलेट ट्रेनचा उपयोग काय? अहमदाबाद ते मुंबई अशी बुलेट ट्रेन चालणार आहे. त्याचा काय उपयोग होणार आहे? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईवर प्रेम आहे तर कांजूरची ओसाड जमीन का देत नाही? पंपिंग स्टेशनला जागा देत नाही, परवानगी देत नाही. मुंबईकरांवरं प्रेम आहे मग का कांजूरची जागा मेट्रो 3 ला द्या. ओसाड जागा आहे तरी का देत नाही. तुम्ही जे काम सुरू केलंय ते आम्ही आडमुठेपणा करत कुठे थांबवलं नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी भाजपला उद्देशून म्हटलं. Mumbai Metro 2A and 7 : उगाच हार्ट काढून त्याला बाण काढू नका; दादांनी तरुणांचे पिळले कान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई मेट्रो 2A (Mumbai Metro 2A) आणि मेट्रो 7  (Mumabi metro 7) या दोन्ही मार्गिकेचं उद्घाटन झालं आहे. ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पहिलं तिकीट काढून मुख्यमंत्र्यांनी याच मेट्रोतून प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Uddhav tahckeray

    पुढील बातम्या