जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : मुंबईत मिळतोय अनोखा पिझ्झा, 'हा' प्रकार तुम्ही खाल्लाच नसेल !

Video : मुंबईत मिळतोय अनोखा पिझ्झा, 'हा' प्रकार तुम्ही खाल्लाच नसेल !

Video : मुंबईत मिळतोय अनोखा पिझ्झा, 'हा' प्रकार तुम्ही खाल्लाच नसेल !

तुम्ही अनेक वेगवेगळ्या ब्रँड्सचे पिझ्झा खाल्ले असतील. पण मटका पिझ्झा कधी खाल्ला आहे का? जाणून घ्या हा पिझ्झा कसा तयार होतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 28 ऑक्टोबर : तुम्ही अनेक वेगवेगळ्या ब्रँड्सचे पिझ्झा खाल्ले असतील. पराठा पिझ्झा, व्हेज पिझ्झा, नॉनव्हेज पिझ्झा व यातील असंख्य फ्लेवर्स बाजारपेठेत सहज मिळतात. पण तुम्ही मटका पिझ्झा कधी खाल्ला आहे का? आता मटका पिझ्झा म्हणताच तुमच्या मनात विविध प्रश्न येतील. पिझ्झा तर मोठा असतो मग मटका त्याच्या आकाराचा असेल का? की पिझ्झा मिनी असेल? चला तर मग हेच व्यावसायिक योगेश गुप्ता यांच्याकडून आपण जाणून घेऊया. अशी झाली मटका पिझ्झा बनवायला सुरुवात  भारतात प्रत्येक पदार्थ हा शिजवून खाल्ला जातो. त्यामुळे पिझ्झा मधील सगळेच पदार्थ शिजवून दिले तर? असं योगेश गुप्ता यांना वाटलं आणि त्यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. पिझ्झा मधील 100% पदार्थ व्यवस्थित शिजवून त्याला वाढायचे कशात? तर पारंपारिक व्यवसायाला सुद्धा चालना मिळावी म्हणून त्यांनी मटक्यात हा पिझ्झा देण्यास सुरुवात केली. तसंच सुरुवातीला ग्राहकांकडून टेस्टचे रिविव्ह घेऊन त्यात हवं नको ते सुद्धा त्यांनी अ‍ॅड केलं. हेही वाचा :  Mumbai : संपूर्ण मुंबई पालथी घातली तरी ‘असा वडापाव’ मिळणार नाही, पाहा Video मटका पिझ्झा कसा बनवला जातो? मटका पिझ्झा खाताना पिझ्झा खाल्ल्याचाही आनंद मिळतो आणि मटका असल्यामुळे अस्सल गावाकडच्या  काहीतरी पदार्थाची चव येते. सर्वप्रथम तर पिझ्झासाठी लागणाऱ्या भाज्या, पनीर, पिझ्झा बेसचे छोटे छोटे तुकडे केले जातात. पॅन मध्ये पुरेसं बटर तापवून चिरलेले पदार्थ मिसळले जातात. ज्या फ्लेवरचा पिझ्झा हवा असेल त्यानुसार मसाले टाकले जातात. मोझेरेला चीज घालून त्याला पॅनमध्ये 80% शिजवलं जातं आणि मग हे शिजवलेलेले लहान मडक्यात घालून चीजचे लेयर करून ओहन मध्ये ठेवले जाते. राहिलेलं 20 टक्के ओहन मध्ये शिजवून मटका पिझ्झा तयार होतो, असं व्यावसायिक योगेश गुप्ता सांगतात. हा पिझ्झा कसा खातात? मटका पिझ्झा ओहन मधून बाहेर काढल्यावर संपूर्ण चीज विरघळलेलं असतं आणि मटक्याच्या मातीची चव सुद्धा त्यात मिक्स झालेली असते. हा पिझ्झा खाण्यासाठी एक काटेरी चमचा दिला जातो. जेणे करून मटक्याच्या आत असलेले पिझ्झा व भाज्यांचे तुकडे खाता येतील आणि चीजच्या फ्लेवरचा आनंद घेता येईल. हेही वाचा :  मुंबईत दोन आहेत ‘गेट वे ऑफ इंडिया’, दुसऱ्याचा इतिहास माहिती आहे का? पाहा Video मटका पिझ्झाचे किती प्रकार उपलब्ध आहेत? मटका पिझ्झाचे साधारण 8-9 प्रकार उपलब्ध आहेत. मखनी पिझ्झा, बटर पिझ्झा, न्यूयॉर्क पिझ्झा, चॉकलेट चीज पिझ्झा ई. प्रकार उपलब्ध आहेत. तसेच 100 ते 300 रुपयांच्या आत उपलब्ध आहेत. गुगल मॅपवरून साभार मटका पिझ्झा कुठे मिळतो? आधी दादर येथील शिवाजी पार्क परिसरात मटका पिझ्झाचं दुकान होते. आता हे मुलुंड येथे कालिदास नाट्यमंदिराच्या समोर सुरु करण्यात आले आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: food , mumbai
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात