मुंबई, 03 सप्टेंबर : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार यावरून जोरदार राजकीय शाब्दिक फैऱ्या झडताना पहायला मिळत आहेत. (Kishori Pednekar) दरम्यान शिंदे गटाकडून राज ठाकरे आणि नारायण राणेंना आमंत्रण दिल्याचे सांगण्यात येत आहे तर शिवसेनेकडून परवानगीसाठी शासकीय पायऱ्या झिजवण्याचे काम सुरू आहे. शिवसेनेतील बंडानंतर पहिल्यांदाच दसरा मेळाव्याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान या सगळ्यात भाजप, शिंदे गट आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्यास सुरू केले आहे. यामध्ये किशोरी पेडणकरांनी ट्वीट करत नवीन ट्वीस्ट भरला आहे.
शिवाजी पार्कवर दसऱ्या मेळाव्यासाठी नेमकी कुणाला परवानगी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सूचक ट्वीट केले आहे. दसरा मेळावा…आतूरता असं म्हणत त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचा पाठमोरा फोटो ट्वीट केला आहे. तर फोटोच्या वर तर दसरा मेळावा शिवतीर्थावरच, मी उद्धवजीं सोबत….असं म्हणत त्यांनी दुसरं ट्वीट केलं आहे.
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 3, 2022
#दसरा_मेळावा शिवतीर्थावरच....
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 3, 2022
मी उद्धवजीं सोबत.... pic.twitter.com/sG6BwJigT9
हे ही वाचा : VIDEO: ‘पन्नास खोके मंत्री OK’; धुळे दौऱ्यात दादा भुसेंचा शेतकऱ्यांकडून निषेध, मंत्र्याने जवळ बोलावलं पण…
या ट्वीटमध्ये त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात लहान मुलं दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार. मी उद्धवजींसोबतच, असं म्हणताना दिसत आहेत. या ट्वीटमुळे चर्चांना चांगलचं उधाण आलं आहे.
यापूर्वीही किशोरी पेडणेकरांनी दसरा मेळ्यावरुन शिंदे गटावर निशाणा साधला होता. एकीकडे बाळासाहेबांचे नाव वापरायचे, शिवसेनेचे नाव वापरायचे, भाजपाची मदत घ्यायची. हा बाळासाहेबांचा अपमान आहे. बाळासाहेब ठाकरे यांची एक पक्ष, एक झेंडा, एक नेता, एक मैदान ही परंपरा निर्माण केली होती, ती उद्धव ठाकरे यांनी चालवली. पण आता राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी वेगवेगळ्या क्ल्युप्त्या काढल्या जात आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या 56 वर्षांच्या परंपरेला छेद देऊ नका, असे आवाहनही त्यांनी शिंदे गटाला केले आहे. तसेच शिवसेना नेमकी कुणाची याबाबतचा निर्णय न्यायालयात होईल, असेही पेडणेकर म्हणाल्या आहेत.
हे ही वाचा : jayant patil : जयंत पाटील म्हणतात खासदार संजय मंडलिक राज्यात आताचे सरकार आहे तोपर्यंत शिंदे गटात राहतील
दसरा मेळाव्याबाबत दिपक केसरकर म्हणतात
आता पुन्हा एकदा दीपक केसरकर यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा घ्यावा असा आग्रह शिंदे गटाच्या आमदारांचा आहे. गणेश चतुर्थीनंतर दसऱ्याला शिंदे गटाच्या आमदारांनी मुंबईतच राहावे, अशा सूचना आमदारांना एकनाथ शिंदेनी दिल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार का? असा प्रश्न विचारल्यावर दीपक केसरकर यांनी याबाबत मुख्यमंत्री यांची भेट घेवूनच मगच बोलेल असं सांगितलं आहे.