मुंबई 23 ऑगस्ट : माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी ते अडचणी येण्याची शक्यता आहे. कारण आता या अनधिकृत स्टुडिओची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. ‘बीड जिल्हा परिषदेत हरवून दाखवा’, मुख्यमंत्री भेटीनंतरं करुणा शर्मांचं धनंजय मुंडेंना चॅलेंज! या स्टुडिओच्या बांधकामाला महविकास आघाडीकडून फेब्रुवारी 2021 मध्ये मान्यता मिळाली होती. महाविकास आघाडीचे पर्यावरणमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री यांच्याकडे वेळोवेळी स्टुडिओच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र, त्यांनी या भागाची पाहणी करूनही कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. काँग्रेस नेते अस्लम शेख यांचा एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे. त्यापैकी 300 कोटींची कागदपत्र आहेत. अस्लम शेख यांनी समुद्रात स्टुडिओ उभारला आहे, असे पाच स्टुडिओ आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. यामध्ये CRZ च्या नियमांचं उल्लघन केलं असून कागदावर ही जागा समुद्रापासून दूर दाखवली आहे, असा आरोप सोमय्या यांनी याआधीच केला होता. ‘90 टक्के लोकांना एसी लोकलची गरज नाही’, जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेत दावा अस्लम शेख आणि भाटिया स्टुडिओ यांचे मालक भागीदार असल्याचं सांगितलं जातं आहे. मंग्रो तोडून स्टुडिओ उभारले आहेत. याला पर्यावरण विभागानं सहा महिन्यासाठी फिल्म सेट उभारणीसाठी परवनगी दिली होती. पण अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने एक हजार कोटी रुपयांचा स्टुडिओ उभारले आहेत, असंही सोमय्या म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.