मुंबई 02 मे : स्पाईसजेटच्या मुंबई-दुर्गापूर विमानाला (Mumbai-Durgapur flight) रविवारी विमानतळावर उतरताना खराब हवामानाचा सामना करावा लागला (SpiceJet Flight Hits Turbulence). यामुळे विमानातील किमान 12 प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपघाताच्या वेळी स्पाइसजेटच्या विमानातील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण होतं.
SpiceJet चं मुंबई-दुर्गापूर विमान लँडिंगदरम्यान वादळात सापडलं, अनेक प्रवासी जखमी
दुर्गापूर विमानतळावर लँडिंगदरम्यान झालेल्या अपघातानंतर आता स्पाइसजेटच्या फ्लाइटमधील या घटनेच्या वेळचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये प्रवाशांमध्ये घबराट स्पष्टपणे दिसत आहे. ४२ सेकंदांचा हा व्हिडिओ फ्लाइटमधील एका प्रवाशाने शूट केला आहे (Inside Video of SpiceJet Flight after Turbulence). मात्र, हा व्हिडिओ अपघाताचा बळी ठरलेल्या स्पाइसजेटच्या विमानातीलच आहे याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
Extreme turbulence in a flight between Mumbai to Durgapur. I can feel what's going on in the minds of passengers when oxygen masks are coming down.
Airline was SpiceJet. Again it was B737 MAX. Never travelling in this aircraft. But thankfully no major accident. 🙏#SpiceJet pic.twitter.com/j7225Ag0UZ — Yuvraj Sharma (@SharmaYuv1) May 1, 2022
व्हिडिओमध्ये स्पाइसजेटच्या फ्लाइटच्या फ्लोअरवर कप, बाटल्या आणि इतर अनेक वस्तू पसरलेल्या दिसत आहेत. ऑक्सिजन मास्क लटकलेले असून केबिनचं सामानही प्रवाशांच्या अंगावर पडल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. यासोबतच एअरहोस्टेस प्रवाशांना धीर देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
अपघातानंतर स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितलं की, "1 मे रोजी स्पाईसजेटचे बोईंग B737 विमान मुंबई ते दुर्गापूर फ्लाइट SG-945 विमानतळावर उतरत असताना वादळात सापडली. ज्यामुळे दुर्दैवाने काही प्रवासी जखमी झाले. प्रवक्त्याने सांगितलं की, विमान दुर्गापूरला उतरल्यावर तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. स्पाईसजेटला या दुर्दैवी घटनेबद्दल खेद वाटतो आणि जखमींना सर्व शक्य वैद्यकीय मदत पुरवत आहोत" .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.