मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आयकर खात्याच्या मुंबईत 5 ठिकाणी धाडी; अनिल परबांच्या निकटवर्तीयाच्या घरीही छापेमारी

आयकर खात्याच्या मुंबईत 5 ठिकाणी धाडी; अनिल परबांच्या निकटवर्तीयाच्या घरीही छापेमारी

आयकर खात्याने मुंबईत 5 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत (Income Tax Department Raid). पहाटे 5 वाजल्यापासून हे सर्च ऑपरेशन सुरू आहे

आयकर खात्याने मुंबईत 5 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत (Income Tax Department Raid). पहाटे 5 वाजल्यापासून हे सर्च ऑपरेशन सुरू आहे

आयकर खात्याने मुंबईत 5 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत (Income Tax Department Raid). पहाटे 5 वाजल्यापासून हे सर्च ऑपरेशन सुरू आहे

मुंबई 08 मार्च : आयकर खात्याने मुंबईत 5 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत (Income Tax Department Raid). पहाटे 5 वाजल्यापासून हे सर्च ऑपरेशन सुरू आहे. यात परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parb) यांचे निकटवर्तीय आणि शिवसैनिक संजय कदम (Sanjay Kadam) यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारली आहे. सकाळपासूनच कदम यांच्या घरावर आयकर विभागाने धाडसत्रं सुरू केलं आहे. तसंच राहुल कनाल यांच्या निवासस्थानी आयकर विभाग छापे टाकून तपास करत आहे.

BREAKING: आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीच्या घरी आयकर विभागाची छापेमारी

पुण्यातील आरटीओचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावरही आयटीने छापा मारल्याची सूत्राची माहिती आहे. संजय मानजी कदम हे शिवसेना पदाधिकारी आहेत. त्यांच्या घरावर आज सकाळी आयकर विभागाने छापेमारी सुरू केली. अंधेरीच्या कैलास नगरमधील स्वान लेक कैलास या इमारतीतील 16 व्या मजल्यावर संजय कदम यांचं घर आहे. संजय कदम अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत आणि ते एक केबल व्यावसायिक आहेत. त्यांच्या अंधेरीतील घरी आयकर विभागाचं एक पथक आलं असून त्यांनी छापेमारी केली आहे.

सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

राहुल कनाल (Rahul Kanal) हेदेखील शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय आहेत. राहुल कनाल हे युवा सेनेचे पदाधिकारी असून शिर्डी मंदिराचं विश्वस्तही आहेत. त्याचबरोबर ते आदित्य ठाकरेंच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहेत. सध्या छापा टाकण्यात आलेल्या ठिकाणी सीआरपीएफ जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

First published:

Tags: Anil parab, Income tax, Raid, Shiv sena