प्रमोद पाटील (नवी मुंबई), 29 ऑक्टोबर :सिडको महांमडळाच्यावतीने नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये दिवाळीच्या शुभमहुर्तावर 7 हजार 849 घरांची लॉटरी जाहीर केली आहे. पण सिडकोकडून बांधण्यात येणारी ही घरे खासगी विकासकांपेक्षा महाग असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सिडकोने बांधलेली घरे स्वस्त किमंतीत मिळतील या अपेक्षेने अर्ज करणाऱ्या ग्राहकांची निराशा होऊ झाली आहे. सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेंअतर्गत केलेल्या विक्री महायोजनेतील घरे ही आजूबाजूच्या खासगी विकासकांच्या घरांपेक्षा महाग असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सिडको या घरांच्या किमतींचा पुनर्विचार करणार का असा सवाल ग्राहकांकडून होऊ लागला आहे.
सिडकोच्यावतीने महागृहनिर्माण योजनेअंतर्गत नवी मुंबईतील उलवे नोड मधील बामणडोंगरी, खारकोपर पूर्व 2 ए, व खारकोपर पूर्व 2 बी, आणि खारकोपर पूर्व पी 3, येथे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील नागरिकांकरीता 7 हजार 849 घरे उपलब्ध केली आहे. या घरांसाठी सिडकोने राखीव ठेवलेल्या किमती भरमसाठ असून त्या आजूबाजूच्या खासगी विकासकांच्या घरांपेक्षा महाग असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : ठाण्यात बुलेट ट्रेनसाठी जमिनी देणाऱ्या भूमिपुत्रांसोबत धक्कादायक प्रकार, मनसेनं दिला इशारा
सिडकोकडून आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांकरीत असणाऱ्या लॉटरीमध्ये 35 लाखांच्या सुमारास किंमत ठेवण्यात आली आहे. तर उत्पन्नांची मर्यादी ही तीन लाखापासून सहा लाखापर्यत आहे. त्यामुळे ज्या लाभार्थीचे तीन लाख रुपये उत्पन्न आहे. त्या व्यक्तीने घर पात्र झाल्यांनतर घर कसे घ्यायाचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर बँक देखील उत्पन्नांच्या मर्यादेनुसार गृहकर्ज देखील देणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सिडकोच्या घरांचे दर हे सर्वसामन्यांच्या आवाक्याच्या बाहेर असल्याने त्यांच्या स्वप्नांवर विरजण पडणार आहे.
सिडकोकडून महागृहनिर्माण योजनेंतर्गतच पाच वर्षापुर्वी घणसोली, खारघर, दे्रणोगिरी, कळंबोली व तळोजा येथे काढलेल्या लॉटरी मध्ये आर्थिक दृष्टया दुर्बल घटाकांतील नागरिकांच्या घरांच्या किंमती या 25 लाखांपासून 27 लाखांपर्यत होत्या. मात्र आता त्यामध्ये पाच वर्षात जवळपास दहा लाख रुपयांची वाढ झालेली आहे. त्यामुळे सिडकोच्या घरांच्या किंमती या सर्वसामन्यांच्या आवक्याबाहेर गेलेल्या आहे.
हे ही वाचा : SRA घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, किरीट सोमय्यांनी केला नवा दावा
तर खाजगी विकासकांच्या तुलनेत देखील त्या जास्त आहे. सिडकोकडून घरांच्या ज्या किंमती ठरवल्या आहे.त्यामध्ये इतर खर्चाचा देखील समावेश केलेला नाही.त्या खर्चामध्ये रजिस्टे्रशन,स्टॅपडयुटी,विद्युत देखभाल दुरुस्ती यांच्या खर्चाचा समावेश करण्यात आला नसून त्यामध्ये जवळपास तीन लाख रुपयांची भर पडते. त्यामुळे सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर सिडकोचे घरे आहे. यासंदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.