मुंबई, 15 मार्च: मागील जवळपास दोन आठवडे राज्यात अवकाळी पाऊस (Non seasonal rainfall) कोसळला आहे. दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीचा (Hailstorm) तडाखा बसला आहे. यानंतर राज्यात आता उष्णतेचं नवीन संकट निर्माण झालं आहे. पुढील काही दिवस मुंबईसह आसपासच्या काही जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट (heat wave) येणाचा इशारा हवामान खात्याने (IMD) दिला आहे. त्यामुळे पुढील किमान दोन दिवस मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा (Temperature in maharashtra) चढाच राहणार आहे. हवामान खात्याने आज मुंबईसह ठाणे आणि रायगड या तीन जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट दिला आहे. काल दक्षिण कोकणात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे काल दिवसभर नागरिकांना तीव्र उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. अचानक तापमानात वाढ झाल्याने काही नागरिकांना उष्माघाताच्या समस्या देखील जाणवल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी कडक उन्हात घराबाहेर पडू नये. किंवा घरातून बाहेर पडताना भरपूर पाणी प्यावं, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. हेही वाचा- कितीही पाणी प्यायलं तरी तहान काही शमत नाही; लगेच टेस्ट करा असू शकतो गंभीर आजार मागील दोन दिवसांपासून मुंबईसह ठाण्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे. वेदर लिंक 2.O या खाजगी संकेतस्थळाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन दिवसात ठाण्यात 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आज पुन्हा येथील तापमानात वाढ झाली असून आज ठाण्यात कमाल तापमानाचा पारा 44 अंशावर पोहोचला आहे. उद्या उत्तर कोकणात उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार असून हवामान खात्याने मुंबईसह पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. हेही वाचा- अति चालणंही ठरू शकतं घातक, या व्यक्तींनी जास्त चालण्यावर ठेवावं नियंत्रण यासोबतच सध्या हिंदी महासागर आणि लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरात पुढील चोवीस तासांत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणून 15 ते 19 मार्च दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर बहुतांशी ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 17 आणि 18 मार्च रोजी याठिकाणी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.