ठाणे, 20 ऑक्टोबर : राज्यात मागच्या दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणूकांमध्ये टोकाची इर्षा पहायला मिळाली. दरम्यान राज्यात महाविकास आघाडीकडून आम्हीच एक नंबरला तर भाजप शिंदे गटाकडून आम्हीच एक नंबरला असा दावा केला जात होता. या सगळ्या घडामोडीत ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत किरकोळ झालेल्या वादावरून माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील खेडले गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. खेडले गावातील भास्कर यशवंत खापरे यांच्या शेतावरील गोठ्यात बांधून ठेवलेली 1 गाय 5 म्हैशी व 3 वासरे अशी एकूण नऊ जनावरांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भास्कर खापरे यांनी काही अज्ञात व्यक्तींवर आरोप केले आहेत. राजकीय वादातून ही घटना घडल्याचे त्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी म्हणजे हा एक उठाव, आशिष शेलारांच्या वक्तव्याने खळबळ
ठाणे जिल्ह्यात नुकताच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये राजकीय वादातून भास्कर खापरे यांच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या जनवरांना अज्ञात वक्तीने विष प्रयोग करून किंवा खाण्यातून विष टाकून मारल्याचा संशयाने तोकावडे पोलीस ठाण्यात अज्ञात वैक्तीच्या नावाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरबाड तालुक्यात ग्रामपंचायतींसाठी 80 टक्के मतदान
मुरबाड तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 80 टक्के मतदान झाले. ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी 300; तर सरपंचपदासाठी 65 उमेदवार रिंगणात आहेत. सायंकाळी चार वाजेपर्यंत एकूण 23 हजार 572 मतदान झाले असल्याची माहिती मुरबाड निवासी नायब तहसीलदार प्रसाद पाटील यांनी दिली. टोकाव कडे व मुरबाड या दोन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीत मतदान शांततेत पार पडल्याची माहिती पोलिसांनी दिली.