मुंबई 26 ऑक्टोबर : मुंबईतील आरे कॉलनीत 16 महिन्यांच्या चिमुकलीवर हल्ला करणारा नरभक्षक बिबट्या अखेर पकडला गेला आहे. या भागात बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर वनविभागाच्या पथकाने काल सापळा लावला होता, त्यात आज बिबट्या अडकला आहे. बिबट्याला पकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे नेण्यात आलं. Aurangabad Crime : दिवाळीच्या पहाटेलाच औरंगाबाद हादरलं, सुरक्षा रक्षकाला ठार करत केली जबरी चोरी सोमवारी ज्या ठिकाणी या बिबट्याने चिमुकलीवर हल्ला केला होता त्या ठिकाणापासून अवघ्या 200 मीटर अंतरावरून बिबट्याला जेरबंद करण्यात आलं आहे. युनिट क्रमांक १५ येथील अखिलेश लोट यांची दीड वर्षाची मुलगी ईतिका हिच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. बिबट्याच्या हल्ल्यात सोमवारी या मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संतप्त रहिवाशांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. इतिका गायब झाल्यानंतर तिच्या घरच्यांना आणि शेजाऱ्यांनी घराच्या आसपास आणि जंगलात तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. काही वेळाने इतिका गंभीर जखमी अवस्थेत सापडली. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. यानंतर घाबरलेल्या संतप्त नागरिकांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली. खोटी मृत्यू प्रमाणपत्रं अन् गोशाळेतील जनावरांची विक्री; भंडाऱ्यातील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश ही मागणी मान्य करून मंगळवारी वनविभागाने युनिट क्रमांक 15 ते आदर्श नगर परिसरात 22 सीसीटीव्ही कॅमेरे लावले, तसंच दोन पिंजरेही लावले. आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. याबाबतची माहिती विनविभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिली आहे. आता या बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आलं आहे. त्यामुळे अखेर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.