जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दादरमधील प्रसिद्ध सुविधा दुकानाच्या मालकाच्या मुलाचा विरारमध्ये आढळला मृतदेह 

दादरमधील प्रसिद्ध सुविधा दुकानाच्या मालकाच्या मुलाचा विरारमध्ये आढळला मृतदेह 

दादरमधील प्रसिद्ध सुविधा दुकानाच्या मालकाच्या मुलाचा विरारमध्ये आढळला मृतदेह 

कल्पेश हा दादरमधील प्रसिद्ध सुविधा दुकानाचे मालक शांतीलाल मारू यांचा मुलगा होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 ऑगस्ट : मुंबईतून बेपत्ता असलेला व्यापारी कल्पेश मारू (४६) याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विरारजवळ त्याचा मृतदेह आढळला आहे. कल्पेश हा दादरमधील प्रसिद्ध सुविधा दुकानाचे मालक शांतीलाल मारू यांचा मुलगा होता. कल्पेश मारू हा १५ ऑगस्टपासून बेपत्ता होता. त्याबद्दल दादर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. १८ ऑगस्ट रोजी विरारजवळील शिरसाड फाट्याजवळ पोलिसांना त्याचा मृतदेह आढळला. त्याच्याजवळ असलेल्या कागदपत्रांवरून त्याची ओळख पटली. नागपूर : पेपर चांगले गेले नाही म्हणून विद्यार्थिनी तणावात, उचललं टोकाचं पाऊल दादर पोलिसांच्या मदतीने त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. कल्पेश हा मानसिक रुग्ण होता आणि यापूर्वी देखील ४ वेळा त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती त्याचे वडील शांतीलाल मारू यांनी दिल्याची माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली. तो विरारला कसा आला त्याचा आम्ही तपास करत आहोत. मात्र या मागे कुठलाही घातपात नसून या प्रकरणी आम्ही अकस्मात मृत्युूची नोंद केल्याची माहिती वाघ यांनी दिली. कल्पेश हा दादरमधील सुविधा या कपड्यांच्या दुकानाचा संचालक होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात