Home /News /maharashtra /

EXCLUSIVE: नवाब मलिक आणि अंडरवर्ल्डचे संबंध काय, मुंबईत डी गँगचे शूटर आहेत का? छोटा शकीलने केले मोठे खुलासे

EXCLUSIVE: नवाब मलिक आणि अंडरवर्ल्डचे संबंध काय, मुंबईत डी गँगचे शूटर आहेत का? छोटा शकीलने केले मोठे खुलासे

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी छोटा शकील (Chhota Shakil) याने प्रथमच मुंबईतील डी कंपनी आणि त्याच्या जवळच्या साथीदारांच्या ठिकाणांवर केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली

    मुंबई 05 ऑगस्ट : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी छोटा शकील याने प्रथमच राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबईतील डी कंपनी आणि त्याच्या जवळच्या साथीदारांच्या ठिकाणांवर केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. देशातील आघाडीचा न्यूज चॅनल न्यूज 18 चे वरिष्ठ वार्ताहर आनंद तिवारी यांच्याशी खास बातचीत करताना छोटा शकीलने ही प्रतिक्रिया दिली. News18 सोबतच्या या खास बातचीतमध्ये छोटा शकीलने दाऊद ते डी कंपनीच्या शत्रू आणि मित्रांबद्दलही प्रतिक्रिया दिली. मुंबईतील अंडरवर्ल्ड आणि डी कंपनीच्या जवळच्या लोकांच्या ठिकाणांवर NIA आणि ED ने नुकत्याच टाकलेल्या छाप्यांबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? छोटा शकील: NIA आणि ED सारख्या तपास यंत्रणा देशभरात त्यांचे काम करत आहेत आणि त्यांना त्यांचे काम करू द्या. तुमचे मेव्हुणे सलीम फ्रूट्रवरही एनआयएची कारवाई करण्यात आली, त्यांना ताब्यात घेण्यात आले. तुमच्या कंपनीसोबत असलेल्या लिंकबद्दल चौकशी केली होती. छोटा शकील: ते कुटुंबातील सदस्य आहेत, कुटुंबातील सदस्य संपर्कात राहतातच. त्यांचा कंपनीशी कोणताही संबंध नाही. कुटुंब हे कुटुंब आहे, त्यांचा कंपनीशी काहीही संबंध नाही. नामांकित बिल्डरला धमकी, मुंबईत पुन्हा डी गँग कार्यरत? छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रूटला बेड्या 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित अब्दुल कयूमला ताब्यात घेण्यात आले होते, त्याचा डी कंपनीशी काय संबंध आहे? छोटा शकील : बॉम्बस्फोटाशी डी कंपनीचा संबंध नाही, असं मी २५ वर्षांपासून सांगत आहे. आम्हाला याबद्दल माहिती नाही. डी कंपनीची पकड मुंबई महाराष्ट्रात होती, ती पकड अजूनही कायम आहे का? तुमच्या टोळीचे सदस्य, शार्प शूटर मुंबईत आहेत का? छोटा शकील : आमच्याकडे आमची खूप लोकं आहेत, गरज पडली तर ते पुढे येतील. पण आता तशी गरज नाही. गँगवार संपलं आहे, कुणी छेडलं तर बघू काय करायचं. परवेझ जुबेर मेननशी काय संबंध? छोटा शकील : त्याला उलटे लटकवा, आमच्याशी काय संबंध आहे ते विचारा. त्याचे नाव आम्ही पहिल्यांदाच नाव ऐकत आहोत, अनीसशी त्याचा काहीही संबंध नाही. VIDEO : बीडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून सशस्त्र दरोडा; लाखोंची रोकड-सोनं लंपास, सीसीटीव्हीत दरोडेखोर कैद दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचे कुटुंब मुंबईत राहते. त्यांच्या ठावठिकाणाबाबत एजन्सी गप्प बसली होती आणि नवाब मलिक आणि अंडरवर्ल्डचे काय संबंध आहेत याचे प्रामाणिकपणे उत्तर द्यावे? ईडीने त्यांना अटक केली. त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप आरोपपत्रात करण्यात आला आहे. छोटा शकील : नवाब मलिकांचं प्रकरण मीदेखील वृत्तपत्रांमध्येच वाचलं आहे. त्यांच्या लिंक्स आहेत का, त्यांनी कोणता प्लॉट खरेदी केला, याच्याशी आम्हाला काही घेणं-देणं नाही. हे प्रकरण आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. आम्हाला हे प्रकरण मीडियामधून समजलं. मात्र, प्रत्येक गोष्ट दाऊद भाईपर्यंत पोहोचणं आणि त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देणं, गरजेचं नाही. आमच्यासाठी ही क्षुल्लक बाब आहे. आम्ही टेन्शन घेत नाही. गुप्तचर अहवाल सांगतो की दाऊद आता घाबरला आहे. तो अंडरग्राऊंड असून आपली फोर्स वाढवली आहे, एजन्सीच्या भीतीमुळे त्याला धोका आहे. छोटा शकील : घाबरलो असतो तर गँगवार सुरू झालं असतं. समोरून बंद आहे ना गँगवार? कोणी मेलं, कोणी तुरुंगात गेलं, छोटा राजन तुरुंगात गेला. आजही आम्ही तयार आहोत. जे हवेत गेले आहेत, त्यांना सोडणार नाही. अली बुदेशकडून धोका होता, तो मेला. तो आमच्यासमोर काहीच नव्हता. दाऊद इब्राहिम पूर्णपणे सुरक्षित आहे. माशा अल्लाह ते ठीक आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Dawood ibrahim, Nawab malik

    पुढील बातम्या