मुंबई 02 सप्टेंबर : मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अगदी कलाकारांपासून राजकीय मंडळी मोठी गर्दी करतात. नवसाला पावणारा बाप्पा अशी याची ख्याती आहे. या नवसपेटीमध्ये दरवर्षी कित्येक पत्र येतात. मात्र, यातील एका पत्राने आता सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. हे पत्र आहे वाशीमध्ये राहाणाऱ्या एका महिलेचं जिने दोन वर्षांपूर्वी आपली मुलगी गमावली. मनसे पदाधिकाऱ्यांची दादागिरी, महिलेला केलेल्या बेदम मारहाणीचा VIDEO व्हायरल समोर आलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी ही महिला आपल्या मुलीसह लालबागच्या राजाच्या दर्शनसााठी आली होती. दोघीही तब्बल आठ तास रांगेत उभ्या राहिल्या मात्र तरीही त्यांना दर्शन मिळालं नाही. यानंतर सिक्युरिटी गार्डसोबत या मुलीचा काहीतरी वाद झाला आणि त्याच दिवशी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आता या मुलीच्या आईने लालबागच्या राजाच्या नवसपेटीमध्ये पत्र टाकलं आहे. या महिलेनं आपल्या पत्रात म्हटलं की, 2019 मध्ये लालबागच्या राजाच्या नवसाच्या रांगेत मी आणि माझी मुलगी आठ तास उभा राहिलो होतो. रांग जराही पुढे न सरकल्याने माझ्या मुलीचे पाय खूप दुखत होते. त्यामुळे माझी मुलगी त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या सिक्युरिटी गार्डसोबत बोलायला गेली. तिथे त्याने तिच्या मनाला लागेल असं काहीतरी चुकीची भाषा वापरून विचित्र उत्तर दिलं. ते ऐकूनच माझ्या मुलीने मला घेतलं आणि रांगेतून बाहेर निघून दर्शनासाठी न थांबता घरी निघालो. माझ्या मुलीचं मानसिक संतुलन त्या दिवशी बिघडलं आणि तिने त्या दिवशी संध्याकाळी गळफास घेऊन स्वतःला संपवलं. आईने पाठवलेल्या या पत्राच्या वरच्या भागात मुलीने काढलेलं एक चित्रही आहे. हे चित्र तिने रांगेतच उभा राहून काढलं होतं. रांगेत उभा राहाणाऱ्या भाविकांना खुर्च्या देण्यात याव्या अशी मागणी करणाऱ्या आशयाचं हे चित्र होतं. आता भाविकांना खुर्च्या देऊन आपल्या दिवंगत मुलीच्या आत्म्यास शांती मिळावी, अशी इच्छा महिलेनं आपल्या या पत्रात व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.