मुंबई 13 मार्च : Narcotics Control Bureau कडून केक आणि ब्राऊनीजमधून नार्कोटिक्स ड्रग्स देणार्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. बेकरी कम ड्रग्स लॅब चालवणारी व्यक्ती ही पेशाने सायकोलॉजिस्ट म्हणजेच मानसोपचार तज्ञ होती. कोर्टाने आता या 24 वर्षीय सायकोलॉजिस्टला जामीन नाकारला आहे (Court Denies Bail to Psychologist). मुंबई हादरली! लोकलमध्ये तरुणीवर ब्लेडने हल्ला, CCTV आला समोर 12 जुलै 2021 रोजी NCB चे संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी एका टीपच्या आधारे दक्षिण मुंबईमध्ये माझगाव परिसरात असलेल्या बेकरी कम घरावर छापा टाकला. तिथे कसून तपास आणि झाडाझडती केल्यानंतर 10 किलो hashish brownie cakes बनवल्याचं आढळलं (Psychologist Arrested for Supplying Hashish-laced Brownies). हे पॅक करून डिलेव्हरी साठी सज्ज ठेवण्यात आले होते. या प्रकरणी रहमीन रफिक चरणिया नावाच्या सायकोलॉजिस्टला अटक करण्यात आली होती. दक्षिण मुंबईमधल्या एका प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये रहमीन रफिक चरणिया काम करत असत. हा व्यक्ती कॉलेजला असल्यापासूनच या ड्रग्सच्या धंद्यामध्ये असल्याची बाब समोर आली होती. NCB ने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विविध प्रकारचे केक द्यायचा. यातील रेनबो केकमध्ये hashish, ganja आणि चरस यांच्या मिश्रणाचा समावेश असायचा. Hashish Brownies आणि Pot Brownies मध्ये weed मिसळलेली असायची.
Passport Verification प्रक्रिया झाली आता आणखी सोपी, पोलीस आयुक्तांची मोठी घोषणा
या व्यक्तीच्या राहत्या घरी 350 ग्राम Opium आणि 1.7 लाख रोकड सापडली होती. विशेष बाब म्हणजे आरोपीने अशाप्रकारे ड्रग्जयुक्त केक बनवण्याची कल्पना एका drug trafficking वर भाष्य करणार्या ओटीटी बेस्ड इंटरनॅशनल सीरीजमधून मिळाल्याचं सांगितलं होतं. याच प्रकरणातील 24 वर्षीय आरोपीचा जामीन आता न्यायालयाने नाकारला आहे.