नवी मुंबई, प्रमोद पाटील (02 ऑक्टोंबर) : कोपरखैरणे येथील बोनकोडे गावातील शिवाजी नगर परिसरात असलेली साई प्रसाद ही 4 मजली इमारत कोसळली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आज (दि.02) सकाळी त्याची बॉडी ढिगाऱ्याखाली मिळाली सदर इमारत धोकादायक होती. मात्र तरीही या इमारतीत अनेक कुटुंब राहत होते.
सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे कोपरखैरणे, बेलापूर आणि इतर ठिकाणच्या कर्मचारी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले होते. दरम्यान रात्री शोधाशोध करताना काहीही सापडले नव्हते दरम्यान सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरु केल्यावर आज सकाळी एका 28 वर्षीय व्यक्तीची बॉडी सापडली.
हे ही वाचा : पुणेकरांना नडला, ‘तो’ मध्यरात्रीच पाडला, चांदणी चौकातील पुलाचे PHOTOS
पुण्याच्या चांदणी चौकातील पूल जमीन दोस्त
पुणेकरांची कोंडी करणारा चांदणी चौकातला पूल अखेर जमीनदोस्त झाला आहे. पहाटेच्या सुमारास स्फोटकांच्या साह्याने अवघ्या 5 सेकंदामध्ये पूल पाडण्यात आला आहे. पूलाचा राडारोडा हटवण्याचे काम सुरू असून सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूक सुरू होणार आहे.
चांदणी चौकातील पूल पाडण्याची मोहिम अखेर फत्ते झाली. रात्रीपासून वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर २.३३ वाजेच्या सुमारास पूल स्फोटकांनी पाडण्यात आला.
पुल पाडण्यात आम्ही १०० टक्के यशस्वी झालो आहोत. आम्ही ब्लास्ट केला त्याचा आम्हाला फायदा झाला. आम्ही मुद्दाम काही भाग ब्लास्ट होणार नाहीत यासाठी सोडले होते. या पद्धतीला fragmentation असं म्हणतात जे पद्धत twin टॉवर पाडण्यासाठी वापरण्यात आली होती त्याला impulsive ब्लास्टिंग असं म्हणले जाते. सकाळी ८ च्या आधीच आमचे काम पूर्ण होईल, असा विश्वास एडीफिस इंजिनिअरिंग कंपनीचे पार्टनर उत्कर्ष गुप्ता यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा : Uttar Pradesh Accident : देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, 11 मुलांसह 26 भाविकांचा जागीच मृत्यू
असा पाडला पूल
पूल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण 35 मिमी व्यासाचे 1 हजार 300 छिद्र पाडण्यात आले होते. 600 किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात आला होता. 1 हजार 350 डिटोनेटरचा उपयोग नियंत्रीत पद्धतीने ब्लास्ट करण्यासाठी करण्यात आली होती. ब्लास्ट एक्स्पर्ट आनंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम फत्ते करण्यात आली.