मुंबई, 14 मार्च : भाजप नेते देवेंद्र फडणवीस (BJP leader Devendra Fadanvis) यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर केल्यानंतर विरोधी पक्ष भाजपचे नेते आणि आमदार टीका करत आहेत. दरम्यान फडणवीसांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, तुम्ही जलयुक्त शिवार योजना बंद केली. मुख्यमंत्र्यांच्या नावाने शाश्वत जल सिंचन योजना सुरू केली. पण त्याला किती पैसे दिले 6 कोटी रुपये. दादा मुख्यमंत्र्यांची काय अवस्था केली? एवढा काय राग आहे तुमचा त्यांच्यावर? मुख्यमंत्रीच्या नावाने योजना आहे. किमान त्यात तरी पैसे ठेवा, नाही तर लोक उद्या म्हणतील की मुख्यमंत्र्यांची एवढीच किंमत आहे. 18 लाख 52 हजार शेतकरी कर्ज बाजारी आहेत. शेतकरी पंचतत्वात विलीन व्हायची वेळ आली आणि तुम्ही पंचसूत्री कसली म्हणता? सुरज चव्हाण सारख्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. अनेकांच्या वडिलांची स्मारकं आपण केली, मी बाळासाहेब यांच्याबद्दल बोलत नाही. ते मोठेच होते. शेतकऱ्यांना थोडा पैसा द्यायचं झालं तर तुमचं काय जातं. सरकारला सुरजच्या मृत्यूनंतर जराही लाज वाटत नाही. हे ही वाचा- फडणवीसांच्या आरोपांना देणार उत्तर, सभागृहात जाण्यापूर्वी गृहमंत्री म्हणाले… पुढे राज्यपालांच्या अभिभाषणावर ते म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषण वर बोलता आलं नाही. पण मद्याचा जी आर काढणारे हे भाषण लिहितात की काय?? हे म्हणजे दुसऱ्यांची लेकरं आपल्या प्रेरणेने झाली असे म्हणायचं. महाराष्ट्राच्या निर्मितीच्या आधीचे प्रकल्प पण आम्हीच केले असे हे सरकार म्हणतं. 1952 चा जो प्रकल्प या सरकारने कसा केला? असा सवाल उपस्थित केला. महाराष्ट्राला ट्रेलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचा संकल्प या अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला महाराष्ट्राला ट्रेलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचा संकल्प अर्थमंत्री अजित दादांनी केला. याआधी ही कल्पना मी मांडली तेव्हा सगळ्यांनी खिल्ली उडवली होती. आम्ही मांडलेल्या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या जात आहेत. 2-3 वर्षात महसुली तूट कमी दाखवायची आणि पुरवणी मागण्या आणायच्या. महसुली तुटीचा आकडा हा फसवा आहे. बजेट बनवतो दाखवण्या करता आणि खर्च मनमानी करतो. खायचे आणि दाखवायचे दात वेगळे. घोषणा वर किती विश्वास ठेवायचा. कर्जाचा प्रमाण वाढलं तर चिंता नको. कर्ज वाढत असताना विकासात्मक किती खर्च हे बघणे महत्वाचं. 4 लाख 51 कोटींचा कारज आता 2 लाख कोटींनी वाढलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.