मुंबई, 28 ऑक्टोबर : मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील बोरीवली भागात सात मजल्याची इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. यात अद्याप किती जीवित वा वित्तहानी झाली याबाबतची माहिती समोर येऊ शकलेली नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहे. इमारतीचं पाडण्याच काम सुरू असताना इमारतीचा स्लॅब कोसल्याचं सांगितलं जात आहे. हा स्लॅब खाली उभ्या असलेल्या गाड्यांवर कोसळला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
#BREAKING : बोरिवलीत सात मजली इमारत कोसळली! इमारतीचं पाडकाम सुरू असतानाच स्लॅबसह इमारत रस्त्यावर कोसळली #MumbaiNews #MarathiNews pic.twitter.com/zP7VjXSoOI
— News18Lokmat (@News18lokmat) October 28, 2022
जाहिरात
बातमी अपडेट होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.