जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bandra Railway Station : 700 कोटींचा चुराडा, थेट झोपड्यांवर कोसळला स्कायवॉक, मुंबईतली घटना

Bandra Railway Station : 700 कोटींचा चुराडा, थेट झोपड्यांवर कोसळला स्कायवॉक, मुंबईतली घटना

Bandra Railway Station : 700 कोटींचा चुराडा, थेट झोपड्यांवर कोसळला स्कायवॉक, मुंबईतली घटना

बांद्रा रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना टळली आहे. पश्चिम उपनगरात असलेल्या बांद्रा रेल्वे स्थानकाजवळ उभा असलेल्या स्काय वॉक अचानक कोसळला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

700 कोटींचा चुराडा, थेट झोपड्यांवर कोसळला स्कायवॉक, मुंबईतली घटनामुंबई, 11 ऑक्टोंबर : बांद्रा रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना टळली आहे. पश्चिम उपनगरात असलेल्या बांद्रा रेल्वे स्थानकाजवळ उभा असलेल्या स्काय वॉक अचानक कोसळला. बांद्रा पूर्वेला स्टेशनजवळील जुन्या स्काय वॉकचा काही भाग झोपड्यांवर कोसळला. योगायोगाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान याबाबत प्रशासनाला सूचना देऊनही जीर्ण झालेला स्काय वॉकबाबत कोणतीही उपायोजना केली नसल्याचे माहिती समोर आली आहे.

जाहिरात

मुंबईतील बांद्रा स्थानकामध्ये बांधण्यात आलेल्या स्काय वॉकबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत काही वृत्त वाहिन्यांनी जीर्ण झालेल्या स्काय वॉकच्या दुरवस्थेबाबत बातम्याही प्रसिद्ध केल्या होत्या. त्यात वांद्रे येथील या जीर्ण झालेल्या स्काय वॉकच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. परंतु याकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने ही घटना घडली आहे. दरम्यान या दुर्घटनेत कोणतीही जिवीत हाणी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा :  दिवाळीआधी मोठा धक्का, महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग

मुंबईतील अनेक ठिकाणी एमएमआरडीएने 700 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या स्कायवॉकच्या उपयुक्ततेबाबत सवाल उपस्थित करण्यात येत आहे. वांद्रे पूर्व ते कलानगर असा पहिला स्कायवॉक 2008 मध्ये बांधण्यात आला होता. मुंबईतील स्थानकांभोवती एकूण 36 स्कायवॉक बांधण्यात आले आहेत.

त्यापैकी २८ स्कायवॉक एमएमआरडीएने तर ८ स्कायवॉक एमएसआरडीसीच्या माध्यमातून बांधले आहेत. स्काय वॉक करण्यासाठी एमएमआरडीएने सुमारे 700 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगण्यात आले, एवढेच नाही तर वार्षिक देखभालीसाठी कोट्यवधी रुपये देण्यात आले. बांद्राच्या स्कायवॉकची जबाबदारी आता बीएमसीची आहे.

जाहिरात

स्काय वॉक मद्यपींचा अड्डा

बोरिवलीत बांधण्यात आलेला स्कायवॉक आता मद्यपान करणाऱ्यांचा अड्डा बनला आहे तर या स्कायवॉकच्या बाजूला अनेकदा दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या दिसतात. तसेच काही लोक तेथे बेकायदेशीरपणे दुकाने थाटून आपली दुकाने चालवत आहेत. अनेकवेळा तक्रार केल्यानंतर दुकानदारांवर कारवाई झाली, मात्र काही दिवसांत परिस्थिती जैसे थे असल्याचे तेथील लोकांचे म्हणणे आहे.

जाहिरात

हे ही वाचा : कार घेणंही अवाक्याबाहेर होणार; येत्या काळात किंमती गगनाला भिडणार?

कल्याणच्या स्कायवॉकवरही गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. प्रशासनाने स्कायवॉकवर खर्च करण्यापेक्षा एमएमआरच्या रस्त्यांवर लक्ष केंद्रित करावे असे लोकांचे म्हणणे आहे. रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून रस्त्यावर रोज अपघात होत आहेत त्यावर नियंत्रण आणावे असा नागरिकांनी रोष व्यक्त केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात