मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एकनाथ शिंदे काँग्रेसकडे प्रस्ताव घेऊन आले होते का? बाळासाहेब थोरातांचं मोठ विधान

एकनाथ शिंदे काँग्रेसकडे प्रस्ताव घेऊन आले होते का? बाळासाहेब थोरातांचं मोठ विधान

 शिवसेनेनं आपल्या दैनिक सामनामधून एकनाथ शिंदे हे काँग्रेस नेत्याकडे हातमिळवणी करण्यासाठी गेले होते..

शिवसेनेनं आपल्या दैनिक सामनामधून एकनाथ शिंदे हे काँग्रेस नेत्याकडे हातमिळवणी करण्यासाठी गेले होते..

शिवसेनेनं आपल्या दैनिक सामनामधून एकनाथ शिंदे हे काँग्रेस नेत्याकडे हातमिळवणी करण्यासाठी गेले होते..

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nanded, India

मुंबई, 02 ऑक्टोबर : शिवसेना आणि शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. आज शिवसेनेनं आपल्या दैनिक सामनामधून एकनाथ शिंदे हे काँग्रेस नेत्याकडे हातमिळवणी करण्यासाठी गेले होते असा गौप्यस्फोट केला आहे. सामनामध्ये खरा इतिहास सांगण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया देत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दुजोरा दिला आहे.

नांदेडमध्ये आता बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात स्पर्धा सुरू आहे. मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचा आरोप खासदार खैरे यांनी केला आहे. राज्यात जे काही चालल ते योग्य नाही, राज्यात कधीही असा इतिहास घडला नाही. पण आता घडत आहे हे दुर्दैव आहे. दसरा मेळाव्यासाठीची स्पर्धा योग्य नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

(....'तेव्हा शिंदे 15 ते 20 आमदारांसह काँग्रेसकडे गेले होते', शिवसेनेचा गौप्यस्फोट)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्यासोबत संधान बांधले  असल्याचा अग्रलेख सामनामध्ये लिहिण्यात आला. त्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, 'याबाबत खूप चर्चा झाली आहे. स्वत: सामनातून खरा घडलेला इतिहास स्पष्ट झाला आहे'

शिंदेंबाबत बोलण्यास अशोक चव्हाण यांचा नकार

एकनाथ शिंदे काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते असा दावा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला होता. मात्र याबाबत कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला. 'मी ऑन रेकॉर्ड यावर काही बोलणार नाही. वास्तव काय आहे ते शिंदेना विचारा असं चव्हाण म्हणाले.

(शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चा जोरात, मिलिंद नार्वेकर म्हणतात, 'मी तर भाग्यवान...')

तसंच, अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत . पण आपण कुठेही तसं वक्तव्य केल नसल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितलं. काही जण अफवा पसरवत आहेत. त्यांना मी का उत्तर देऊ असं चव्हाण म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा येत्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र राज्यात येणार आहे. राज्यात नांदेडहुन या यात्रेला सुरुवात होणार आहे. पाच नोव्हेंबर रोजी नांदेडच्या देगलूर येथे यात्रा येणार आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे. राज्यात यात्रेचा 18 रात्रीचा मुक्काम असेल. राज्यात भारत जोडे यात्रेचा 360 किलोमीटर प्रवास असणार आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

First published: