मुंबई 01 एप्रिल : 100 कोटी वसुली प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होतं. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. आता अनिल देशमुख आणि सचिन वाझे (Sachin Vaze) यांचा ताबा सीबीआयला (CBI) देण्यात आला आहे. यासोबतच कुंदन शिंदे यांचाही ताबा CBI घेणार आहे. आता हसन मुश्रीफ भाजपच्या रडारवर; न्यायालयात याचिका दाखल, सोमय्यांचा आज पुणे दौरा ईडीच्या (ED) तपासानंतर या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पुढील चौकशीसाठी सीबीआयला अनिल देशमुख, सचिन वाझे , संजीव पलांडे तसंच कुंदन शिंदे या चौघांचाही ताबा हवा होता. यासंदर्भात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या या चारही आरोपींचा ताबा घेण्यासाठी सीबीआयने मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. यावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचे डी.पी. शिंगाडे यांच्यासमोर सुनावणी झाली. यानंतर सीबीआयचा हा अर्ज कोर्टानं स्वीकारला आहे. त्यामुळे या सर्वांचा ताबा आता सीबीआयकडे देण्यात आला आहे. . काही दिवसांपूर्वी कोर्टाच्या परवानगीनंतर सीबीआयनं कारागृहात जाऊन या सर्वांची चौकशी केली होती. मात्र यात आरोपींनी पुरेसं सहकार्य न केल्याने सीबीआयने अर्ज करत ही मागणी केली होती. सामान्यांच्या खिशाला चाप! National Highway वर टोल टॅक्स वाढल्याने आजपासून किती मोजावी लागणार रक्कम? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अनिल देशमुख अडचणीत सापडले. यानंतर देशमुखांची ईडी मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरू केली. 21 एप्रिलला देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आणि 12 तासांच्या चौकशीनंतर 1 नोव्हेंबर रोजी ईडीनं त्यांना अटक केली. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.