मुंबई, 13 ऑक्टोबर : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंनी आपला उमेदवारही घोषित केला. मात्र, त्यांच्या उमेदवाराचा राजीनामा BMC कडून स्वीकारला गेला नाही. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाही, तर त्यांची उमेदवारी अडचणीत सापडण्याची शक्यता होती. त्यामुळे ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेत आपला राजीनामा स्वीकारला जावा, अशी मागणी केली. यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.
लटकेंचा राजीनामा आदेश मंजुर करण्यात आल्याची माहिती समोर आला आहे. हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे लटकेंना ठाकरेंकडून निवडणूक लढवण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत. शिंदे आणि ठाकरे गटासाठी ही अटीतटीची लढाई आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या बाजूने ऋतुजा लटके यांना निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी बीएमसीत राजीनामा टाकला होता. अखेर बऱ्याच युक्तीवादानंतर उच्च न्यायालयाने तो मंजूर केला आहे. उद्या 11 वाजेपर्यंत लटकेंचा राजीनामा मंजूर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने बीएमसीला दिला आहे.
ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया...
-न्यायदेवतेवर माझा विश्वास होता, त्या प्रमाणे मला न्याय मिळाला आहे.
-माझे पती रमेश लटके यांनी जे कार्य केले, त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणार.
-मला दिलासा वाटला, मात्र मला कोर्टात जायचं नव्हतं.
-उद्या निवडणुकीचा उमेदवारी भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उद्याच मी फॉर्म भरणार आहे.
-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मशाल या चिन्हातून निवडणूक लढवणार आहे.
-मला पालिकेकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा होती. मात्र तो पाठिंबा मिळाला नाही.
-माझ्यावर झालेले भ्रष्टाचाराने आरोप चुकीचे, याबाबत वकिलांशीच बोला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Andheri, High Court, Mumbai, Shivsena