मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /26/11 Mumbai Attack: माजी भारतीय राजदूताचा धक्कादायक खुलासा! पाकिस्तानची लबाडी केली उघड

26/11 Mumbai Attack: माजी भारतीय राजदूताचा धक्कादायक खुलासा! पाकिस्तानची लबाडी केली उघड

26/11 Mumbai Attack: पाकिस्तानमधील माजी भारतीय राजदूत शरत सभरवाल यांनी 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा केला आहे. 2010 मध्ये, इस्लामाबादमधील तत्कालीन राजदूत सभरवाल यांना पाकिस्तान लष्कराने सांगितले होते की, लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईदच्या विरोधात कोणतेही पुरावे नसल्याने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

पुढे वाचा ...

मुंबई, 29 जुलै : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा यांची भूमिका कोणापासूनही लपलेली नाही. मात्र, या हल्ल्यात दहशतवादी हाफिज सईद आणि त्याच्या लष्कराची भूमिका पाकिस्तानने नाकारली आहे. पाकिस्तानमधील भारताचे माजी राजदूत शरत सभरवाल यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. 2010 मध्ये इस्लामाबादमधील भारताचे तत्कालीन राजदूत शरत सभरवाल यांना पाकिस्तानी लष्कराने लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईदविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे सांगितले होते.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, शरत सभरवाल यांनी त्यांच्या नवीन पुस्तक "इंडियाज पाकिस्तान कोंड्रम"मध्ये लिहिले आहे की, त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या संवादकला हाफिज सईदच्या भूमिकेवर नवी दिल्लीने दिलेले पुरावे सांगितले. पण, त्यावर कोणतीही कृती केली नाही. कोणतीही वचनबद्धता दाखवली नाही.

या हल्ल्यात पाकिस्तानचे लष्कर आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा यांच्या भूमिकेबाबत भारताने अनेक पुरावे पाकिस्तानला दिले होते. मात्र, पाकिस्तानने ते स्वीकारण्यास नकार दिला होता. शरत सभरवाल यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की ऑगस्ट 2010 मध्ये त्यांची पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ संवादकासोबत बैठक झाली होती. यादरम्यान पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्याने त्यांना सांगितले की, मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात लष्कर आणि आयएसआयचा हात नाही.

पाकिस्तानात फिरायला आलेल्या अमेरिकन Vlogger सोबत धक्कादायक कृत्य; एकाला अटक

पाकिस्तानी लष्कराने तपासात मदत केली होती ज्यामुळे मुंबई हल्ल्यातील गुन्हेगारांना पकडण्यात यश आले होते. पण चर्चा सुरू करण्यापूर्वी हाफिज सईदवर कारवाईची अपेक्षा भारत करत असेल, तर हल्ल्यात त्याच्या सहभागाचा कोणताही पुरावा नसल्याने तसे होणार नाही.

पाकिस्तानातून आलेल्या अजमल कसाबसह 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल आणि नरिमन हाऊससह अनेक ठिकाणी हल्ले करून 166 निष्पाप लोकांचा बळी घेतला होता. नॅशनल सिक्युरिटी गार्ड्सनी या दहशतवाद्यांशी सुमारे तीन दिवस लढा दिला होता. आणि त्यांना ठार केले. या हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याने या हल्ल्यात हाफिज सईद आणि दहशतवादी संघटनांच्या सहभागाबाबत अनेक खुलासे केले होते. या हल्ल्यातील दोषी अजमल कसाबला फाशी देण्यात आली.

First published:

Tags: 26/11 mumbai attack