मुंबई, 16 ऑगस्ट : राज्यातील काही भागात पावसाने थैमान घालायला सुरूवात केली आहे. दरम्यान पुणे आणि विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला आहे तर राज्यातील मुख्य शहर असणाऱ्या मुंबईत सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरात पावसाने जोरदार बॅटींग केल्याने पावसाचे पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. होत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले.
मात्र, आज काहीसा पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, मुंबईसह परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. तसेच कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आज आणि उद्या कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हे ही वाचा : Bhandara Rain Update : भंडाऱ्यात वैनगंगा नदीचे रौद्ररुप, 25 गावांचा संपर्क तुटला, 82 मार्ग बंद
बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. 16) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भ, उत्तर मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मान्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाब क्षेत्र ते ईशान्य बंगाल उपसागरापर्यंत कायम आहे. मान्सूनच्या आसाचा पश्चिम भाग सर्वसाधारण स्थितीत तर पूर्व भाग दक्षिणेकडे राहण्याची शक्यता आहे. दक्षिण गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
हे ही वाचा : Weather Update: पुण्याला आज धो धो धुणार; राज्यात कुठल्या कुठल्या भागात पावसाचा Alert?
विदर्भ, मराठवाड्यात ढगांनी दाटी केली आहे. आज (ता. १५) रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर उत्तर कोकण,मध्य महाराष्ट्रासह कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे.