मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Mumbai : सुरुवातीलाचं मिळणार थेट 5 लाखांचं पॅकेज; यासाठी Mumbai University मध्ये फक्त 'हा' कोर्स करावा लागणार

Mumbai : सुरुवातीलाचं मिळणार थेट 5 लाखांचं पॅकेज; यासाठी Mumbai University मध्ये फक्त 'हा' कोर्स करावा लागणार

मुंबई विद्यापीठ, मुंबई.

मुंबई विद्यापीठ, मुंबई.

विद्यार्थ्यांना चांगले जाॅब मिळावे आणि त्यांच्या हाताला काम मिळावे, यासाठी मुंबई विद्यापीठाने अनेक कोर्स सुरू केलेले आहेत. त्या कोर्स पैकीच एक एम. ए. इन पॉलिटिकल सायन्स हा कोर्स, मुंबई विद्यापीठातील हा कोर्स महत्त्वाचा असून पगारासोबत नवी ओळखही मिळवून देणारा आहे.

पुढे वाचा ...

    मुंबई, 6 जुलै : 'बी.ए. इन पॉलिटिकल सायन्स'मध्ये (B. A Bachelor of Arts in Political Science) पदवी झालेल्या विद्यार्थ्यांना 'एम. ए. इन पॉलिटिकल सायन्स' हा (M.A Master of Arts in Political Science) करीअरचा एक चांगला पर्याय आहे. धोरण बनविण्याच्या प्रक्रियेपासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या अंमलबजावणीपर्यंत, सरकारी आणि बिगर-सरकारी संस्थांमध्ये पॉलिटिकल सायन्स मध्ये करीअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी भरपूर आहेत. भारतीय लोकशाही, लोकशाहीची यंत्रणा, संविधान, राजकारण याचे महत्वपूर्ण ज्ञान आपल्याला राज्यशास्त्रातून मिळते. तुम्ही या विषयात करिअर करण्यासाठी इच्छुक असालतर मुंबई विद्यापीठात 'एम. ए. इन पॉलिटिकल सायन्स' हा (M.A political science course in mumbai university) कोर्स सुरू करण्यात आला आहे. चला तर मग या कोर्सबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया...

    कसा घ्याल प्रवेश?

    मुंबई विद्यापीठात एम. ए. इन पॉलिटिकल सायन्स कोर्सला प्रवेश घेण्याची प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. जे विद्यार्थी बी.ए. इन पॉलिटिकल सायन्स पदवीधर आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. मात्र, ज्यांचा कोर्स पॉलिटिकल सायन्स नसेल त्यांना फॅकल्टी चेंज प्रवेश प्रक्रिया द्यावी लागणार आहे. एम. ए. इन पॉलिटिकल सायन्स कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया 12 जुलै पासून सुरू होणार आहे. या कोर्सचे स्वरूप साधारणपने 2 वर्षाचे राहणार असून 4 सेमीस्टर असणार आहेत. या कोर्ससाठी 8 हजार फी असणार आहे. त्याचबरोबर या कोर्सेससाठी 35 विद्यार्थी संख्या आहे. आरक्षण हे सरकारी नियमानुसार दिले जाणार आहे.

    वाचा : कोण होणार भाजपाचा नवा प्रदेशाध्यक्ष? 3 नेत्यांमध्ये जोरदार चुरस

    विद्यार्थ्यांना कोणत्या सोई-सुविधा मिळणार?

    या कोर्सेसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल, लायब्ररी, डिपार्टमेंट लायब्ररी, सेमिनार, कॉन्फरन्स, फील्ड ट्रीप, इंटर्नशिप, महाराष्ट्र संसद भवन भेट इत्यादी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

    सॅलरी किती असणार?

    हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये आयएएस, आयपीएस,आयएफएस परीक्षेत संधी तसेच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संधी मिळणार आहेत. तसेच थिंक टँक, एनजीओमध्ये नोकरीच्या संधी आहेत. एम. ए. इन पॉलिटिकल सायन्स कोर्स पूर्ण केल्यानंतर साधारपणे 4 ते 5 लाखांचं वार्षिक पॅकेज मिळेल. इतकंच नाहीतर जस जसा तुमचा अनुभव वाढत जातो, तसा पगारही वाढत जातो. 

    वाचा : 'शिंदेंना भेटायला हे वेशांतर करून जात होते', अमृता फडणवीसांनी सांगितला घरातला किस्सा

    यासंदर्भात पॉलिटिकल सायन्सचे प्राध्यापक लियाकत खान सांगतात की, “एम. ए. इन पॉलिटिकल या विषयाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर यामध्ये विद्यार्थ्यांना अनेक संधी आहेत. पुढे जाऊन करीअर करण्यासाठी अनेक मार्ग ऊपलब्ध आहेत. थिंक टँक,एनजीओ, निवडणूक आयोग या क्षेत्रात करियर करण्यासाठी विविध पर्याय खुले आहेत. तसेच नागरी सेवा परीक्षा, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बसण्यासाठी लागणार ज्ञान हे या कोर्स मधून विद्यार्थ्यांना मिळते. या कोर्सचा फायदा विद्यार्थ्यांना नक्की त्यांच्या भावी आयुष्यात होईल.”

                                                                                                                                                                   गुगल मॅपवरून साभार...

    संपर्क कसा कराल?

    नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विभाग मुंबई विद्यापीठ, फिरोजशाह मेहता भवन, कालिना कॅम्पस, सांताक्रूझ पूर्व, मुंबई 400098 या पत्त्यावर तुम्ही विभागास भेट देऊ शकतात. त्याचबरोबर dept.civics.politics@gmail.com  ईमेलवरही तुम्ही संपर्क साधू शकता. https://mu.ac.in/department-of-civics-and-politics या लिंकवर क्लिक करून अधिक चौकशी करू शकता किंवा 022 – 26504457/26526175 या नंबरवर संपर्क साधू शकता.

    First published:

    Tags: Career, Career opportunities, Mumbai