Home /News /maharashtra /

राणा दाम्पत्याविरोधात 'तो' गुन्हा दाखल करणं भोवलं; मुंबई सत्र न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं

राणा दाम्पत्याविरोधात 'तो' गुन्हा दाखल करणं भोवलं; मुंबई सत्र न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं

राणा दाम्पत्याविरोधात (Rana couple) राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आज मुंबई सत्र न्यायालयानं आपलं मत नोंदवलं आहे. न्यायालयानं आपलं मत नोंदवताना राज्य सरकारला फटकारलं आहे.

मुंबई, 06 मे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm Uddhav Thackeray) यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण (hanuman chalisa) करणाऱ्या निर्धार करून आलेले आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची काल 13 दिवसांनंतर जेलमधून सुटका झाली. राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आज मुंबई सत्र न्यायालयानं आपलं मत नोंदवलं आहे. न्यायालयानं आपलं मत नोंदवताना राज्य सरकारला फटकारलं आहे. राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं मुंबई सत्र न्यायालयानं निरीक्षण नोंदवताना म्हटलं आहे. यावेळी न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं आहे. काय म्हटलं मुंबई सत्र न्यायालयानं? नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही. राणा दाम्पत्याला जामीन देताना मुंबई सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणा यांना दिलेल्या जामीनाची प्रत नुकतीच उपलब्ध झाली होती. त्यात दिलेल्या माहितीनुसार पोलिसांच्या नोटीसनंतर राणा घराबाहेर पडले नाहीत. राणा दाम्पत्याला अटक होण्यापूर्वीच त्यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्याचं आंदोलन मागे घेतलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर आयपीसी कलम 124 A अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं मत न्यायालयानं म्हटलं आहे. 4 मे रोजी राणा दाम्पत्याला जामीन मंजूर नवनीत राणा आणि रवी राणा यांना (Navneet Rana and Ravi Rana) जामीन मिळाला. मुंबईच्या सत्र न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. राणा दाम्पत्याने त्यांच्यावर लावण्यात आलेल्या कलम 153A आणि 124A विरोधात जामिनासाठी अर्ज केला होता. मुंबईच्या सत्र न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला. या पाच अटींवर जामीन मंजूर मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केल्यनंतर पाच अटी घातल्या आहेत. न्यायालयानं घातलेल्या अटींनुसार, रवी राणा आणि नवनीत राणा यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई असेल. तसंच तपासात कोणतेही अडथळे आणू नये, असे आदेश न्यायालयानं दिलेत. या घटनेशी संबंधित असलेल्या साक्षीदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही, त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही, अशीह एक अट न्यायालयाकडून घातली आहे. नेमकं प्रकरण काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धार करत खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) अमरावतीहून मुंबईत आले. त्यानंतर झालेल्या संघर्षानंतर राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली. राणा दाम्पत्याच्या विरोधात राजद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला. 24 एप्रिलपासून राणा दाम्पत्य हे न्यायालयीन कोठडीत असून त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Navneet Rana, Ravi rana, State government

पुढील बातम्या