मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; भरधाव कंटेनर ट्रक उलटला, 2 जण गंभीर जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; भरधाव कंटेनर ट्रक उलटला, 2 जण गंभीर जखमी

ट्रकमधील चालक तसेच क्लिनर हे दोघेही अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

  • Share this:

अनिस शेख, मावळ, 29 जून : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनर ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक वीस फूट महामार्गाखाली येऊन पलटला. ट्रकमधील चालक तसेच क्लिनर हे दोघेही अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात 94 किलोमीटर किवळे एक्झिट जवळ 8 वाजण्याच्या सुमारास झाला.

अपघातातील दोन्ही जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक महामार्गावरून खाली कोसळल्याने कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी झाली नाही. लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर एक्स्प्रेसवेवरील वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.

हेही वाचा - टेम्पोतील अज्ञात महिलेच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक खुलासा, गळा चिरून केला खून

एक्सप्रेसवेवर आज दिवसभरातील हा तिसरा अपघात असून तिन्ही अपघातात दोघांचा मृत्यू तर सहा जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. भरधाव वेगावर चालकाला नियंत्रण न मिळवता आल्याने हे अपघात झाले आहेत.

First published: June 29, 2020, 10:42 PM IST

ताज्या बातम्या