गणेश दुडम, प्रतिनिधी, मावळ : तुम्ही जर पुणे-मुंबईकडे जाण्यासाठी किंवा त्या रस्त्याने कुठे फिरायला जाणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेसने प्रवास करणार असाल तर थांबा, खूप जास्त तुम्हाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. मे महिना आणि शनिवार रविवारच्या सुट्ट्यांमुळे सध्या बरेजण बाहेर फिरायला जात आहेत. विकेण्डचे प्लॅन असल्याने लोक घराबाहेर पडली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. तुम्ही घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर लाईव्ह स्टेटस चेक करूनच बाहेर पडा.
ऑनलाईन वाहन चलानमुळे मोडला व्यक्तीचा संसार, नक्की असं काय घडलं?विकेण्डला वाहतूक कोंडी, प्रवाशांचे हाल; घराबाहेर पडण्याआधी चेक करा ट्रॅफिक स्टेटस#traffic #marathinews #News18lokmat pic.twitter.com/3gy6lxvtnK
— News18Lokmat (@News18lokmat) May 20, 2023
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ वाहनांच्या रांगा दिसत आहेत. विकेण्डचा आनंद लुटण्यासाठी आणि आपापल्या गावी जाण्यासाठी मुंबईकर बाहेर पडले आहेत. परिणामी द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. काल रात्री ही अशीच वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती.
सलग 12 तासांहून अधिक काळ वाहतूक धीम्या गतीनं सुरू असल्याने काही प्रवाशांचा संतापही झाला आहे. नियोजित वेळेत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही आधीच ट्रॅफिकचा अंदाज घेऊन घराबाहेर पडणं तुमच्या फायद्याचं राहू शकतं.