नालासोपारा (विजय देसाई), 03 मार्च : मीरा भाईंदर वसई विरारच्या आयुक्तालयातील काशिमिरा गुन्हे शाखेच्या युनिटने मोठी कामगिरी केली आहे. या शाखने 2 महिन्याच्या अथक परिश्रमानंतर मेवाती टोळीचा पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर राजस्थान ,गुजरात आणि हरियाणा, उत्तरप्रदेश दिल्लीमधील चोरी झालेल्या वाहनांचा शोध लावला आहे. मीरा भाईंदर, वसई, विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या काशीमीरा पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंतराज्यीय आयशर टेम्पो चोरी करणारे मोठे रॅकेट उध्वस्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मीरा भाईंदरमधील विनय कुमार पाल यांचा आयशर कंपनीचा टेम्पो 25 डिसेंबर 2022 मध्ये चोरीला गेला होता. याप्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे,सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली काशिमिरा गुन्हे शाखेच्या पथकाने मीरा भाईंदरपासून खानिवडे टोल नाका, गुजरात राजस्थान, असे सर्वत्र 500 हून अधिक सीसीटीव्ही तपासले होते.
‘फुटपाथवर राहणारे लोकही माणसेच..’ मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय; हटवण्याची होती मागणीपाल यांची गाडी गुजरातपर्यंत गेल्याचे सीसीटीव्हीत निष्पन्न झाले. मात्र पुढे त्या गाडीचा शोध लागत नव्हता. एकदा नव्हे तर 10 वेळा सीसीटीव्ही तपासले. मात्र गाडी पुढे कुठे गेली हेच समजत नव्हते. परत केलेल्या निरीक्षणात गाडीचा नंबर बदलल्याचा दाट संशय होता.
शुभ लाभचा पोलिसांना झाला लाभ
गुजरात मधून सीमा पार केल्यावर खेरवारा टोलनंतर गाडीचा नंबर गुजरात पासिंगचा केला. त्यानंतर ती गाडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजस्थानमध्ये पतोडी हरियाणापर्यंत गेली आणि पुढे नाहीशी झाली त्याच टोल नाक्यावरून परत दोन दिवसांनी गाडीवरचा नंबर तोच चेसी आणि इंजिन नंबर बदलून गांधीनगरपर्यंत गाडी आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
मात्र पाल यांच्या गाडीवर शुभ लाभ लिहिलेल असल्याने तीच गाडी असल्याचे ठाम मत पोलिसांचे झाले. तांत्रिक तपासात फारूख तय्यब खान हा अल्वर मेवाती येथे असल्याचे पोलिसांना समजले. मात्र त्या गावात मेवाती जमात राहत असून तेथील लोक सायबर क्राईम एटीएम चोरी, सर्व प्रकारचे गुन्हेगार राहतात बाहेरून आलेल्या पोलिसांचा सुगावा लागल्यानंतर तेथील लोक गुन्हेगारांना लपवून ठेवतात. त्यामुळे या आरोपीला पकडणे शक्य नव्हते.
त्यांना जर आरोपीला पकडायला बाहेरील पोलीस आले आहेत असा सुगावा लागल्यास ते त्यांच्यावर हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाहीत त्यामुळे मोठ्या जोखमीचे काम होत. आपल्या प्राणांची पर्वा न करता पोलिसांनी आमची बाईक चोरीला गेली ती शोधतोय अस खोट सांगून पोलीस वेगवेगळ्या राज्यात 2 महिने वावरत होते.
शिंदे फडणवीस सरकारला औरंगाबाद खंडपीठाचा दणका; ठाकरेंचे निर्णय रद्द करणे अंगलटयादरम्यान महाराष्ट्र पोलिसांनी राजस्थान, गुजरात, पोलिसांची मदत घेतली. दरम्यान आरोपी फारुख तय्यब खान हा व्हॉली बॉल खेळण्यासाठी येणार असल्याची पक्की खबर पोलिसांनी मिळाली होती. फारुख गेम खेळायला गेला आणि त्याचा काशिमिरा गुन्हेशाखेने गेम केला. त्याचा साथीदार मुबीन हारीस खान अटक केल्यानंतर महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. मेवाती टोळीमधील हे सदस्य असून ते रस्त्याकडेला उभी असलेली अवजड वाहने चोरी करायचे. व या वाहनांचे इंजिन, चेसी नंबर व नंबर प्लेट बदलून इतर राज्यात आरटीओ रजिस्ट्रेशन करून विक्री करायचे.
मीरारोड मधील असाच एक आयशर ट्रक चोरी झाल्याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस त्याचा तपास करत होते.. याच दरम्यान पोलीस राजस्थानपर्यंत पोहोचले आरोपींना अटक केली आहे. या टोळीमध्ये आणखी दहा आरोपी असून पोलीसांची विविध पथके त्यांचा शोध घेत आहेत.