जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ठाकरेंच्या मालमत्तेची चौकशी होणार का नाही? मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

ठाकरेंच्या मालमत्तेची चौकशी होणार का नाही? मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

उद्धव ठाकरेंच्या मालमत्तेची चौकशीची मागणी करणारी याचिका

उद्धव ठाकरेंच्या मालमत्तेची चौकशीची मागणी करणारी याचिका

उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 मार्च : उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. गौरी भिडे यांनी ही याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून लावत असतानाच मुंबई हायकोर्टाने गौरी भिडे यांना धक्काही दिला आहे. याचिकाकर्त्याला मुंबई हायकोर्टाने 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. काय होती गौरी भिडे यांची याचिका? कोरोना काळात सामना या वृत्तपत्राला इतका फायदा कसा काय झाला? प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे नेमकं स्त्रोत काय आहेत? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे पर्यावरणमंत्री असताना 2020 ते 2022 या कोरोना काळात सामना वृत्तपत्राचा टर्नओव्हर 42 कोटी रुपये इतका होता, ज्यात साडे अकरा कोटी रुपयांचा नफा झाला. उद्धव ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाचा नेमका स्त्रोत काय? या सगळ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडे यांनी केली होती. कोण आहेत गौरी भिडे? गौरी भिडे या प्रकाशक आहेत, त्यांच्या आजोबांचं ‘राजमुद्रा’ नावाचं प्रकाशन आहे. सामना आणि मार्मिकच्या विक्रीतून एवढी संपत्ती गोळा करणं अशक्य असल्याचा आरोप गौरी भिडे यांनी केला आहे. आपलाही हाच व्यवसाय असून दोघांच्या उत्पन्नात एवढा फरक कसा? असा सवाल गौरी भिडे यांनी विचारला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात