मुंबई : अगदी दोन दिवस जरी सुट्टी असेल तरी लगेच गावची वाट धरली जाते. अशावेळी जर तुम्ही मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन जाताना तुम्ही जर परशुराम घाटातून जाण्याचा विचार करत असाल तर थांबा, आताच तुमचा प्लॅन रद्द करा किंवा बदला. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रस्त्याच्या कामादरम्यान डोंगराची माती रस्त्यावर आली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.
खोपोलीत भीषण अपघात चालकाला डुलकी लागली आणि भयंकर घडलं, पाहा PHOTOतुम्ही जर मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करणार असाल किंवा करायचा विचार असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी#news18lokmat #marathinews pic.twitter.com/1PQKyIVzE9
— News18Lokmat (@News18lokmat) February 2, 2023
घाटाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत. दोन्ही बाजूची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. मात्र प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने चाकरमन्यांचे हाल झाले आहेत. त्यामुळे तुम्ही जर या मार्गाने विकेण्डला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हा रद्द करा किंवा बदलला नाहीतर तुम्हीही असे अडकू शकता.