जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, पनवेल जवळील पलस्पे फाटा पाण्याखाली; जनजीवन विस्कळीत

मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, पनवेल जवळील पलस्पे फाटा पाण्याखाली; जनजीवन विस्कळीत

पनवेलमधील पाऊस परिस्थिती

पनवेलमधील पाऊस परिस्थिती

या सर्व पाऊस परिस्थितीमुळे पनवेल परिसरात जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे.

  • -MIN READ Panvel,Raigad,Maharashtra
  • Last Updated :

प्रमोद पाटील, प्रतिनिधी पनवेल (रायगड), 20 जुलै : महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच पुढचे काही तास पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यात मात्र, अजूनही पावसाची संततधार कायम नागरिकाचे प्रचंड हाल होत आहेत. जनजीवन पूर्णपणे विस्कळित - पनवेल परिसरात होत असलेल्या या पावसामुळे पनवेल जवळील पलस्पे फाटा पाण्याखाली आला आहे. यामुळे मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला असल्याने दोन्ही बाजूला वाहने आणि प्रवाशी अडकले आहेत. तसेच दोन्ही बाजूच्या वाहनांची वाहतूक बंद झाली आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाला फटका बसला आहे. अजूनही पावसाची संततधार कायम असून नागरिकाचे प्रचंड हाल होत आहेत. या सर्व पाऊस परिस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे.

News18लोकमत
News18लोकमत

कोकणातल्या शाळांना उद्या सुट्टी - महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये मागच्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, तसंच पुढच्या 24 तासांमध्येही पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे, त्यामुळे उद्या मुंबईसह, ठाणे, कोकण विभागातील शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मुंबईसह कोकणामध्ये कालपासूनच मुसळधार पाऊस पडतो आहे. कोकणातल्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेनही विस्कळीत झाली आहे. हवामान खात्याचा इशारा बघता राज्य सरकारने मुंबई आणि कोकणातल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच राज्यातील इतर भागांमध्ये स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. खालापूरमधील गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना - रायगडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर आता खालापूर तालुक्यातील इरसालगड या गावातून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. या वाडीवर दरड कोसळली आहे. मोरबे धरणाच्या बाजूला असलेल्या या वस्तीवर दरड कोसळली आहे. 50 ते 60 घरांची ही वस्ती आहे. ही घटना बुधवारी रात्री 11.30 ते 12 वाजताच्या दरम्यान घडली. मुसळधार पाऊस पडत असताना घडलेल्या या घटनेत काही जणांचा जीव गेला असल्याचीही माहिती समोर येत आहे. तर, काही नागरिक सुखरूप वाचले आहेत. काही अद्यापही खाली अडकलेले आहेत. अनेकजण मृत्यूमुखी पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात