मुंबई, 18 जून : माणसांचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी योगासनं (Yoga) अत्यंत महत्वाची आहेत. भारतात महर्षी पतंजली यांना योग पिता मानलं जातात. योगासने केल्यामुळे अनेक आजार, विकार बरे होतात. तसेच शरीरासाहित मनाचे स्वास्थ्य ही तितकेच महत्वाचे आहे. तन आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग हा एक उत्तम पर्याय आहे. म्हणूनच योगाचे महत्व हे फक्त भरतीयांनीच नाही तर परदेशीयांनी ही मान्य केले आहे. म्हणूनच 21 जून हा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा केला जातो. आज आपण 'वज्रासन' आणि 'पद्मासन' कसे करायचे (How to do Vajrasana and Padmasana?) आणि त्याचे फायदे काय आहे, त्याबद्दल जाणून घेऊ...
वाचा : Yoga series Episode – 1 : योगासने करण्यापूर्वी warm up exercise कसा कराल, पहा VIDEO
योग सुरू करण्याअगोदर बॉडी वॉर्म अप कसे करायचे ते आपण आधीच्या भागात पाहिले आहेच. त्याचा आधार घेऊन तुम्ही सर्वप्रथम बॉडी वॉर्म अप करावे. वज्रासन हे आसन अतिशय सोपे असून ते करायला फार वेळ लागत नसून कुठेही करता येऊ शकतं. वज्रासन केल्याने तुमचे पाठीचे किंवा कंबरेचे दुखणे बरे होऊ शकते. वज्रासन हे जेवण केल्यानंतर ही करता येईल असे आसन आहे, ज्यामुळे तुमची पचनशक्तीसुद्धा चांगली होते. पद्मासन आसन केल्यानंतर पायांचा कमळासारखा आकार होत असल्यामुळे याला पद्मासन असे म्हणतात. ध्यान करण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे. हे आसन करतानाही पाठीचे दुखणे कमी होते.
1) पचनशक्ती चांगली करते
2) पाठदुखी असेल तर कमी करते
3) झोप सुधारण्यास मदत करते
4) वज्रासन ध्यानासाठीही चांगले मानले जाते
पद्मासनाचे हे आहेत फायदे
1) मन शांत ठेवण्यासाठी उपयुक्त
2) प्रचंड उर्जादायी हे आसन आहे
3) या आसनात तुम्हाला ध्यान ही करता येते.
4) पाठीच्या आणि हृदयाच्या आजारांसाठी हे उपयुक्त असते.
अशाप्रकारे ही दोन सोपी आसनं या भागात आपण शिकलो. करायला सोपी, कमी वेळात आणि कमी जागेत होणारी ही आसनं प्रत्येकाला फायदेशीर आहेत.
योगासनाचा इतिहास काय आहे?
योगाला 10 हजारांपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. या परंपरेचा उल्लेख नारदीय सुक्त आणि सर्वात प्राचीन अश्या ऋग्वेदामध्ये आढळतो. हा आपणास पुन्हा सिंधू-सरस्वती सभ्यतेचे दर्शन घडवतो. या सभ्यतेमधील पशुपतीनाथांच्या एका नाण्यावर योगमुद्रा विराजमान आहे, जी त्या काळातील योगाच्या व्यापकतेचे द्योतक आहे. अतिप्राचीन उपनिषद बृहद अरण्यक मध्ये योगामधील काही शारीरिक आसनांचा उल्लेख आढळतो.
वाचा : Yoga Day 2022: मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी Yoga कराच; पण आसनं करताना घ्या ही काळजी
छान्दोग्य उपनिषदामध्ये प्रत्याहारचा तर बृहद अरण्यकमधील एका स्तवनामध्ये प्राणायामचा सविस्तर उल्लेख आहे. प्रचलित योगाच्या स्वरूपाचा प्रथम उल्लेख कठोपनिषदमध्ये आहे, जी आयुर्वेदाच्या कथा शाखामधील अंतिम आठ वर्गांमध्ये पहिल्यांदा येते. जे मुख्य आणि अत्यंत महत्वाचे उपनिषद आहे. येथे योगाला अंतर्मनाच्या यात्रेसाठी तसेच चेतनेच्या विकासासाठी गरजेच्या प्रक्रियेच्या रुपात जाणले जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Types of exercise, Yoga day