मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुंबईची प्रसिद्ध 'राणीची बाग' पहिलेय? इथं हत्ती, वाघच नाही तर पेंग्विन्सही पहायला मिळतात, पहा VIDEO

मुंबईची प्रसिद्ध 'राणीची बाग' पहिलेय? इथं हत्ती, वाघच नाही तर पेंग्विन्सही पहायला मिळतात, पहा VIDEO

X
राणीची

राणीची बाग, मुंबई

50 वर्षांचा इतिहास असणाऱ्या मुंबईच्या राणीच्या बागेत फिरायचं म्हणजे पर्यटकांसाठी आणि लहान मुलांसाठीही मोठी आनंदाची गोष्ट असते. मुंबईसारख्या वातावरणात पेंग्विन्स, हत्ती, वाघ आणि बरेच पशुपक्षी पहायचे असतील, राणीची बाग उत्तम ठिकाण आहे.

पुढे वाचा ...

    मुंबई, 13 जून : मुंबईतील अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत. त्या यादीत 'राणीची बाग' ही (The famous Queen's Garden in Mumbai) प्रसिद्ध आहे. हे ठिकाण मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच भायखळा येथे आहे. ही पर्यटकांचं खास आकर्षण आहे. या बागेत विविध प्रकारची पुरातन झाडे, वेगवेगळे प्राणी, पक्षी, कासवे , साप, असे अनेक प्रकारचे पशुपक्षी आहेत. या बागेत येणं म्हणजे लहान मुलांसाठी मोठी पर्वणीच असते. विषेश हे की, मुंबईच्या वातावरणात या बागेत पेंग्विन्सही (Penguins) पहायला मिळतात, अशा वैशिष्ट्यपूर्ण राणीच्या बागेची चला तर सफर करूया...

    या बागेमध्ये तब्बल 64 अंतर्गत बागा आहेत. तर ही राणीची बाग 60 एकर परिसरात पसरलेली आहे. 1961 मध्ये ब्रिटिश राजवटीत 'व्हिक्टोरिया गार्डन्स' या नावाने हे उद्यान सुरू केलं होतं. नंतर 1980 साली त्याचे नामकरण वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय असे करण्यात आले. हे उद्यान आता 50 वर्ष जुनं आहे. ही बाग उभी करण्यासाठी समाजसेवक नाना शंकरशेट, भाऊ दाजी लाड अशा मान्यवरांंनी सहकार्य केलं होतं.

    वाचा : मुंबईत खरा निसर्ग अनुभवायचंय? संजय गांधी नॅशनल पार्कचा हा SPECIAL REOPORT जरूर वाचा

    राणीची बाग दर बुधवारी बंद असते. जर बुधवारी एखादी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी बाग पर्यटकांसाठी खुली ठेऊन दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते. तसेच आनंदाची बाब म्हणजे लहान मुलांची ही बाग एक आकर्षणाचं केंद्र असल्याने दर शुक्रवारी 12 वर्षांखालील मुलांना बागेत मोफत प्रवेश दिला जातो.

    गुगल मॅपवरून साभार...

    कसं जायचं राणीच्या बागेत?

    लोकल ट्रेनने मध्य रेल्वेच्या भायखळा या स्थानकावर उतरायचे. भायखळा स्टेशनपासून पूर्व दिशेने बाहेर पडल्यानंतर डावीकडे चालत अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर राणीची बाग आहे. या बागेत प्रवेश करण्यासाठी प्रौढांना 50 रुपये, तर 12 वर्षांखालील मुलांना 25 रुपये असा तिकीट दर आहे. या बरोबरच खासगी वाहने आणल्यास त्यांचा पार्किंग दर दुचाकीसाठी 5 रुपये, तर चारचाकीसाठी 20 रुपये असा आहे.

    First published:

    Tags: Mumbai News