मुंबई, 31 मे : मुंबईच्या माटुंगा लेबर कॅम्प मधील अवघ्या 21 महिन्याच्या समर्था सक्रोला हिची बुद्धिमत्ता चर्चेचा विषय बनलाय. समर्थानं नुकत्याच झालेल्या जनरल नॉलेजमधील एका स्पर्धेत अवघ्या पाच मिनिटात 70 प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. या पराक्रमामुळे समर्थाचं नाव इन्सुलिन सर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, यंग मेमरी चॅम्पियन, युनिव्हर्सल रेकॉर्ड बुक, इम्प्रेसिव्ह रेकॉर्ड आणि बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, मेमरी किड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलंय. 21 महिन्यात जग जिंकलं समर्थानं एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या तीन ऑनलाईन स्पर्धेत हे रेकॉर्ड केले आहेत. त्यामध्ये तिनं राष्ट्रगीत, ए टू झेड अल्फाबेट, अवयवांची नावे, फळ, भाज्या, वाहनांची नावे, प्राण्यांची नावे, इंग्रजी कविता, पक्षांची नावे, भारतीय चलनातील नोटा - नाणी, राष्ट्रीय पक्षी, प्राणी, फळ, फुल, देशाची राजधानी, देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्रतील एकूण जिल्हे याची झटपट माहिती देत रेकॉर्ड रचला.
समर्थाची आई महालक्ष्मी सक्रोला एक ट्युशन टीचर आहेत. घरात मुलांची ट्यूशन घेत असतानाच समर्थाला या विषयात आवड आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर गेल्या 10 महिन्यापासून त्या समर्थाला शिकवत आहेत. बॉक्सिंगसाठी बदलली शाळा, पुणेकर प्रतीक्षानं बारावीतही लगावला जोरदार ‘पंच’, Video समर्थानं काही महिन्यातच प्रोफाइल ऑफ इंटरनॅशनल टॅलेंट अँड इंटलेक्च्युअल आणि इंडियास वर्ल्ड रेकॉर्ड ऑनलाइन स्पर्धेत भाग घेतला. त्याचबरोबर या स्पर्धेत इतिहासही रचला, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असं महालक्ष्मी यांनी सांगितलं.

)







