जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / संतापजनक! आईनेच 15 दिवसांच्या मुलीला वेश्या व्यवसायासाठी विकलं

संतापजनक! आईनेच 15 दिवसांच्या मुलीला वेश्या व्यवसायासाठी विकलं

जन्माच्यावेळी बाळांच्या सेक्स रेशोच्या दरात जम्मू- काश्मीर इतर राज्यांच्या पुढे आहो. जम्मू- काश्मीरमध्ये जन्माच्या वेळचा सेक्स रेशो हा 921 आहे, तर देशाचा सरासरी दर हा 919 आहे. गेल्या पाच वर्षांचे आकडे पाहिले तर लक्षात येतं की देशातील इतर राज्यांच्या तुलनेत जम्मू- काश्मीरचा सेक्स रेशो जास्त चांगला आहे.

जन्माच्यावेळी बाळांच्या सेक्स रेशोच्या दरात जम्मू- काश्मीर इतर राज्यांच्या पुढे आहो. जम्मू- काश्मीरमध्ये जन्माच्या वेळचा सेक्स रेशो हा 921 आहे, तर देशाचा सरासरी दर हा 919 आहे. गेल्या पाच वर्षांचे आकडे पाहिले तर लक्षात येतं की देशातील इतर राज्यांच्या तुलनेत जम्मू- काश्मीरचा सेक्स रेशो जास्त चांगला आहे.

वेश्या व्यवसायासाठी नवजात बालकाची विक्री करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सत्यम सिंह, मुंबई, 31 जानेवारी : पैसे कमावण्यासाठी लोक किती खालच्या थराला जाऊ शकतात, हे दाखवणारी घटना मुंबईत समोर आली आहे. मुंबई ही मायानगरी या मायानागरीत अनेक जण पोटाची खळगी भरण्याकराता वाट धरतात. कोण दिवसरात्र मेहनत करत पोट भरतो तर काही जण लवकर श्रीमंत होण्यासाठी वाकडी वाट धरतात आणि माणुसकीला काळीमा फासेल अशी कामे करतात. वेश्या व्यवसायासाठी नवजात बालकाची विक्री करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हे आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. वेश्या व्यवसायात आणण्यासाठी हे आरोपी नवजात बालकाची बिहारमधून तस्करी करून मुंबईत आणत आणि त्यांची विक्री कुंटन खान्यात करत होते. बांद्रा पश्चिम येथील कुरेशी नगरमध्ये काही व्यक्ती नवजात बालकाला घेऊन वेश्या व्यवसायात विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला आणि आरोपींना अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी 2 वेश्या दलाल महिलांसह एका पुरुष दलालाला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 15 ते 20 दिवसांचे नवजात बाळ हस्तगत केल आहे. तपासात हे बाळ बिहारमधील एका महिलेने जन्म दिल्यानंतर केवळ दहा हजार रुपयांना विकले होते. दहा हजाराच्या मुलीचा सौदा केल्यानंतर तिला कुरेशी नगर येथे आणण्यात आले होते. याच ठिकाणी तिची वाढ करून त्यानंतर तिला वेश्याव्यवसाय ढकलण्यात येणार होते यासंदर्भात मुंबई पोलीस अधिक तपास करीत असून या टोळीमध्ये आणखीन किती जण संलग्न आहेत याचा शोध घेतला जात आहे. लहान भावाने ‘ऑन द स्पॉट’ घेतला बदला, बहिणीची छेड काढणाऱ्या गुंडाची केली हत्या दरम्यान, अश्या प्रकारे नवजात बालकाला नरकात ढकलून त्यांचे बालपण तर हिरावून घेतलेच जाते. पण त्याचबरोबर संपूर्ण आयुष्य नरक यातना भोगाव्या लागतात. ज्या आईने थोड्या पैशाकरता आपल्या पोटच्या गोळ्याला विकले तिला आई तरी का म्हणावे? असा संतप्त सवाल आता विचारण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात