प्रशांत मोहिते, नागपूर, 31 जानेवारी : विवाहितेच्या घरात शिरून तिची छेडछाड करणाऱ्या गुंडाचा विवाहितेच्या भावाने खून केल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडली आहे. गुंडाची हत्या केल्यानंतर विवाहितेच्या भावाने पोलीस स्थानकात जात आत्मसमर्पण केलं आहे. विवाहितेची छेड काढल्यानंतर परिसरातच फिरत असलेल्या गुंडाचा अखेर विवाहितेच्या लहान भावाने परिसरातील मंदिराच्या आवारातच खून केला आणि पोलिसांकडे जाऊन आत्मसमर्पण केले. एखाद्या चित्रपटाला शोभेल असा हा थरार काल मध्यरात्री नागपूरच्या मिनिमाता नगर परिसरात घडला आहे. वादानंतरही छेडछाड करणारा रोशन हा मिनिमाता नगर परिसरातून गेला नाही आणि तिथेच घुटमळत राहिला. थोड्या वेळानंतर गुरु घासीदास गुरुद्वारा परिसरात त्याने पुन्हा विवाहितेचा भाऊ राजा भारती सोबत वाद घातला आणि चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस हाणामारीत राजा भारतीने रागाच्या भरात गुंड रोशन चौरसियाच्या हातून चाकू हिसकावून घेत त्याचा खून केला. हातावरची मेहंदी उतरण्याआधीच मृत्यूने गाठलं, नवविवाहितेला हौस पडली महागात बहिणीच्या अब्रुसाठी आपल्या हातून खून झाला याची कल्पना आल्यानंतर राजा पळून गेला नाही. त्याने थेट कळमना पोलीस स्थानक गाठून स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन करत आत्मसमर्पण केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.