MSBSHSE SSC Result LIVE: निकालापासून ते गुणपडताळणीपर्यंत सर्व प्रक्रिया Online, 4 पद्धतीनं भरता येणार शुल्क
दहावीचा निकाल बुधवारी आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत mahresult.nic.in वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. याशिवाय न्यूज 18 लोकमतवरही हा निकाल पाहू शकणार आहात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात आली होती. या निकालाचे सर्व अपडेट्स जाणून घ्या.
Lokmat.news18.com | July 29, 2020, 4:23 PM IST
Last Updated July 29, 2020
auto-refresh
Highlights
4:23 pm (IST)
SSC Result :अकरावीत मनासारखं कॉलेज मिळणं होऊ शकतं अवघड, 90s club ची स्पर्धा वाढली
2:52 pm (IST)
0 टक्के निकाल लागलेली एकही शाळा कोकणात नाही, सर्वाधिक शाळा कुठल्या विभागात
2:52 pm (IST)
Maharashtra Board SSC Result 2020 Maharashtra Board SSC Result 2020 : शब्बास पोरांनो! राज्यातील 242 विद्यार्थ्यांना मिळाले 100 टक्के गुण
1:55 pm (IST)
विद्यार्थ्यांनाा उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती ईमेल, रजिस्टर पोस्टानं, हस्तपोहोच करण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना वेबसाईटवर पर्याय निवडायचा आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना 400 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
1:53 pm (IST)
गुणपडताळणी अर्ज करण्याची मुदत 30 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 50 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
1:46 pm (IST)
दहावीचा निकाल न्यूज 18 लोकमतवर पाहू शकता.
1:39 pm (IST)
(http://verification.mh- ssc.ac.in) या संकेतस्थळावर अर्ज भरल्यानंतर आपल्याला डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा UPI अथवा नेट बँकिंगच्या सहाय्यानंच पैसे भरता येणार आहेत.
1:38 pm (IST)
(http://verification.mh- ssc.ac.in) या वेबसाईटवर गुणपडताळणी अथवा आपल्या उत्तरपत्रिकेची छायांकित प्रति हव्या असतील तर इथे अर्ज करून ऑनलाइन पद्धतीनं शुल्क भरायचं आहे. त्यासाठी बोर्ड ऑफिसला जाण्याची आवश्यकता नाही.
1:37 pm (IST)
उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर (http://verification.mh- ssc.ac.in) स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय करून देण्यात येणार आहे. पण विद्यार्थी आणि पालक या संकेतस्थळावरूनही अर्ज करू शकतात.
1:36 pm (IST)
गुणपडताळणीसाठी अनेक विद्यार्थ्यांची गडबड असते. दरम्यान सध्या ऑनलाइन पद्धतीने देखील गुणपडताळणी करता येणार आहे. ऑनलाईन निकाल लागल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्याला त्याच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी करता येते.
मुंबई, 29 जुलै: दहावीचा निकाल बुधवारी आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत mahresult.nic.in वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. याशिवाय न्यूज 18 लोकमतवरही हा निकाल पाहू शकणार आहात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात आली होती. या निकालाचे सर्व अपडेट्स जाणून घ्या.