मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /MPSC Exam 2020: विद्यार्थ्यांना मिळणार कोव्हिड किट, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी SOP जाहीर

MPSC Exam 2020: विद्यार्थ्यांना मिळणार कोव्हिड किट, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी SOP जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Maharashtra Public Service Commission) आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांकरता मानक कार्यप्रणाली (SOP Standard Operation Procedure) जारी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Maharashtra Public Service Commission) आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांकरता मानक कार्यप्रणाली (SOP Standard Operation Procedure) जारी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Maharashtra Public Service Commission) आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांकरता मानक कार्यप्रणाली (SOP Standard Operation Procedure) जारी करण्यात आली आहे.

मुंबई, 19 मार्च: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Maharashtra Public Service Commission) आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांकरता मानक कार्यप्रणाली (SOP Standard Operation Procedure) जारी करण्यात आली आहे. या नियमावालीबाबतच्या सूचना विद्यार्थ्यांना पाठवण्यात आल्या आहेत. MPSC कडून राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी स्वतंत्र नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ज्याचे काटेकोरपणे पालन करणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे. 21 मार्च रोजी ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यापूर्वी कोरोना (Coronavirus) संदर्भातील नियम काय आहेत, हे जाणून घेणं आवश्यक आहे.

परीक्षार्थींना कोव्हिड किट मिळणार असून ट्रिपल लेअर मास्क परिधान करणे बंधनकारक असणार आहे. शिवाय कोव्हिड सदृश्य लक्षणं असणाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष देखील असणार आहे. या परिक्षार्थींना कोव्हिड किट देखील बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षेदरम्यान स्वच्छता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसंच परीक्षा संपल्यानंतर गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

काय आहे परीक्षेसाठीची नियमावली?

1. परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करताना किमान तीन पदरी कापडाचा मास्क अनिवार्य

2.परीक्षा कक्षात मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझरचा पाऊच असणारे एक किट उपलब्ध करून दिले जाईल. दोन्ही सत्रासाठी याचा वापर करणं अनिवार्य

3. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्वच्छता आणि आरोग्यास हितावह वातावरण राखण्यास हात सतत सॅनिटाइझ करणं आवश्यक

4. कोव्हिड सदृश्य लक्षणं असणाऱ्या परीक्षार्थींची परीक्षा वेगळ्या कक्षात होईल. त्यांना मिळणाऱ्या पीपीई किटमध्ये मास्क, हातमोजे, फेस शील्ड, मेडिकल गाऊन, मेडिकल शु कव्हर, मेडिकल कॅप असेल.

5. परीक्षा केंद्रावरील माहिती फलक, सांकेतिक चिन्हं, भित्तीपत्रिका इ. सूचनांचा वापर सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्यासाठी करावा

6. परीक्षा संपल्यावर सोशल डिस्टंन्सिंग पाळणं अनिवार्य

7. वापरलेले टिशू पेपर, मास्क, हातमोजे, सॅनिटाइझ पाऊच परीक्षा केद्रावरील आच्छादित कुंडीत टाकावे

8. कोव्हिडबाबते केंद्र आणि राज्याकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे

First published:

Tags: Career opportunities, Coronavirus, Covid kit, Covid-19, Fight covid, Mpsc examination, Operation